कवी नितीन चंदनशिवे यांच्यामुळे संमेलन बहरले
शिरोळ / प्रतिनिधी
येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित ११ व्या साहित्य संमेलनात निमंत्रित कवी व काव्यकट्टा यामध्ये सुमारे ४८ कवीनी सहभाग घेत कविता सादर केल्या. या संमेलनात सादर झालेल्या कवितांना चांगला प्रतिसाद मिळाला. निमंत्रित कवी संमेलनात कवी नितीन चंदनशिवे (कवठेमंकाळ ) यांनी विशेष सूत्रसंचालन करून संमेलनाच्या कार्यक्रमाला जाण आणली. विविध विषयावर सादर झालेल्या कवितानी कधी परिवर्तनासाठी शाब्दिक चिमटा काढला तर काही विनोदी शैलीतील कविता सादरीकरणातून जागृतीचा लोकजागर झाला. त्यामुळे या साहित्य संमेलनात मिळालेल्या सांस्कृतिक मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध झाले.येथील दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ख्यातनाम कवी विठ्ठल वाघ व प्रसिद्ध धन्वंतरी डॉ अनिल मडके यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन व कथाकथन झाले. त्यानंतर निमंत्रितांचे काव्य वाचन व काव्य कट्टा अशा दुहेरी काव्य वाचनाच्या मैफिलीने संमेलनाला वेगळीच रंगत आली. कवी चंदनशिवे यांनी विविध विषयावर कवीनी सादर केलेल्या कवितांचा घेत समाजातील दुःख, वेदना, जबाबदारी याबरोबरच परिवर्तनशील विचारधारेवर भाष्य करून श्रोत्यांची मने जिंकली. यावेळी कवी चंदनशिवे यांच्यासह प्रसाद कुलकर्णी, डॉ राजश्री पाटील, नीलम माणगावे , सरिता राजमाने, नाना हलवाई, रोहित शिंगे, दस्तगीर नदाफ , डॉ उमेश कळेकर, सुवर्णा पवार, डॉ कुमार पाटील, उदय शिरोळकर, सचिन इनामदार, भीमराव धुळुबुळू, स्वाती भापकर, विजया हिरेमठ, रवी बावडेकर आदी कवीनी कविता सादर केल्या. त्यानंतर अंतीम सत्रात साहित्यिक संजय सुतार (नांदणी ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्यकट्टा मध्ये सुमारे २८ कवींनी कविता सादर करून रसिकांची मनी जिंकली. कविता सादरीकरणाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. शेती , कुटूंब , राजकारण यावर समस्या मांडत तर काही कवींनी सामाजिक, प्रेम विषयक कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. या कवी मध्ये यशोधरा ढाले, बाबुराव कांबळे, अशोक काळे, महेश कालिंगे, सुरेश पुजारी, धोंडीलाल मुजावर, प्रकाश पोतदार, मदन गावडे , सुभाष हापटे , कोमल गावडे, विजय पोवार, राजकुमार रुग्गे, सचिन कोरोचीकर, विष्णू वासुदेव, सदाशिव कुलकर्णी, राहुल कदम ,शिवाजी माने, अमन पटेल, निलेश चव्हाण, महेश सटाले ,शिवाजी जाधव आदि कवींनी सहभाग घेतला.साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार, उपाध्यक्ष डॉ दगडू माने, सचिव शंतनु यादव , सदस्य तथा उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, प्रा डॉ मोहन पाटील, अविनाश उर्फ पांडुरंग माने, संजय सुतार ,सचिन इनामदार यांच्यासह शब्दगंध साहित्य परिषद पदाधिकाऱ्यासह विविध संस्था व व्यक्तींचे सहकार्य लाभले.