उदगाव जि.प. व अर्जुनवाड पं.स.मतदार संघातील युवक शाहू विकास आघाडीच्या पाठीशी ठाम : युसुफअली इनामदार

Spread the love

कनवाड / प्रतिनिधी 

उदगाव जिल्हा परिषद व अर्जुनवाड पंचायत समिती मतदार संघातील आगामी निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार अमोल चव्हाण व सीमा म्हैशाळे यांच्या पाठीशी मतदार संघातील सर्व युवक संपूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा सचिव युसुफअली अकीलअली इनामदार यांनी केले.उदगाव जिल्हा परिषद मतदार संघातील विविध गावांतील युवक,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.युसुफअली इनामदार म्हणाले की,आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात विकास म्हणजे काय हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.रस्ते, पाणीपुरवठा,शिक्षण,आरोग्य सुविधा तसेच युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे.“काम बोलतंय म्हणून नाव बोलतंय” या विश्वासावर तालुक्याने त्यांना साथ दिली आहे.याच विश्वासाच्या जोरावर राजर्षी शाहू विकास आघाडीने उदगाव जिल्हा परिषद मतदार संघातून अमोल चव्हाण व अर्जुनवाड पंचायत समिती मतदार संघातून सीमा म्हैशाळे यांना उमेदवारी दिली आहे. अमोल चव्हाण व सीमा म्हैशाळे हे दोघेही युवक, शेतकरी,महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेले, विकासाभिमुख नेतृत्व आहे,असे इनामदार यांनी सांगितले. मतदार संघातील युवकांचे रोजगार, शिक्षण,क्रीडा सुविधा, सामाजिक प्रश्न तसेच पायाभूत विकासासाठी या दोघांचे योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या माध्यमातून मतदार संघाचा सर्वांगीण विकास निश्चितच साध्य होईल, असा विश्वास युवक वर्गामध्ये आहे.त्यामुळे या निवडणुकीत मतदार संघातील सर्व नागरिक, शेतकरी,महिला,युवक व ज्येष्ठांनी एकजुटीने अमोल चव्हाण व सीमा म्हैशाळे यांना भरघोस पाठिंबा देऊन विजयी करावे,असे आवाहन युसुफअली इनामदार यांनी केले.या वेळी उपस्थित युवकांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!