संकटातही न डगमगता पक्षाशी एकनिष्ठ उभे राहिलेले उदय पाटील, दत्तवाड मतदारसंघातील मतदारांचा ठाम विश्वास

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी 

दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक सामाजिक, राजकीय व नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला असला तरी उदय पाटील यांनी कधीही गाव सोडून पळ काढलेला नाही. संकटाच्या काळातही ते नेहमी पक्षाशी एकनिष्ठ व जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असून सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात त्यांनी नेहमीच अग्रभागी भूमिका बजावली आहे,अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.दरम्यानच्या काळात राजकीय द्वेषातून उदय पाटील यांना अडकवण्याचे प्रयत्न झाले. मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी काँग्रेस पक्षाशी आपली निष्ठा कायम ठेवत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम सुरूच ठेवले.पक्षसंघटना मजबूत करताना त्यांनी तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला.त्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात संकटे आली तरी पळून न जाता मतदारसंघातच थांबून काम करणारे नेतृत्व म्हणून उदय पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.घोसरवाड, दत्तवाड, टाकळीवाडी, सैनिक टाकळी, जुने दानवाड, नवे दानवाड, राजापूर, राजापूरवाडी आणि खिद्रापूर या गावांमधील मतदारांनी एकत्र येत उदय पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.राजकीय असो वा नैसर्गिक संकट असो, जे नेते संकटाच्या वेळी गाव सोडून पळून जातात, अशा व्यक्तींच्या पाठीशी दत्तवाड मतदारसंघातील जनता उभी राहणार नाही.यावेळी अनेक नागरिकांनी उदय पाटील यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना सांगितले की, ते नेहमी उपलब्ध राहतात, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहतात आणि कोणताही भेदभाव न करता काम करतात. त्यामुळे आगामी काळातही दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात जनतेचा विश्वास आणि पाठिंबा उदय पाटील यांनाच मिळेल, असा ठाम विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!