माघारीनंतरही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कार्यकर्ता – संतोष बिडवे

Spread the love

उदगाव / प्रतिनिधी 

उदगाव परिसरात गेली अनेक वर्षे सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवणारे,खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच खासदार धनंजय महाडिक यांचे कट्टर समर्थक संतोष बिडवे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतल्याने परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.संतोष बिडवे यांनी निवडणूक लढवावी,अशी सर्वसामान्य नागरिकांची प्रामाणिक आणि आग्रही मागणी होती.मात्र शिरोळ तालुक्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांतदादा पाटील,खासदार धनंजय महाडिक,गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे तसेच भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या शब्दाखातर त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतली.या निर्णयानंतर उदगाव गावासह संपूर्ण परिसरात सर्वसामान्य मतदारांनी प्रत्यक्ष भेटी घेऊन तसेच फोनद्वारे संतोष बिडवे यांच्याप्रती आपली नाराजी व्यक्त केली.तुम्ही आमचे खरे नेतृत्व आहात”, “तुम्हीच निवडणूक लढवावी” अशा भावना व्यक्त करत मतदारांनी त्यांच्यावर असलेले प्रेम आणि विश्वास उघडपणे दाखवून दिला.अनेक वर्षे केलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्याची हीच खरी पोचपावती असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.सामान्य नागरिकांचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास पाहून संतोष बिडवे हे भावूक झाले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,पद आणि प्रतिष्ठेपेक्षा सर्वसामान्य जनता हीच माझी खरी दौलत आहे.गेल्या अनेक वर्षांत मी जे सामाजिक कार्य केले,त्याचे खरे फळ आज मिळत आहे.जनतेचा विश्वास आणि प्रेम यापेक्षा मोठे कोणतेही पद नाही.त्यांनी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले.पुढे बोलताना त्यांनी असेही स्पष्ट केले की,येणाऱ्या काळातही ते सर्वसामान्य जनतेसाठी कायम कार्यरत राहणार असून खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आणि युवाशक्तीच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतील. “निवडणूक लढवली नाही म्हणून माझे काम थांबणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करून न्याय देणं हेच माझे खरे ध्येय आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.दरम्यान,अशा एकनिष्ठ, प्रामाणिक आणि खऱ्या अर्थाने तळागाळातील जनतेशी नाते जपणाऱ्या कार्यकर्त्याला भविष्यात भक्कम साथ देण्याची गरज असल्याची भावना मतदारांमधून व्यक्त होत आहे.संतोष बिडवे यांच्यासारखा कार्यकर्ता हा उदगाव परिसरासाठी नव्हे तर संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत असून, भविष्यात त्यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!