सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील नरुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण, नरुटे यांचा आंदोलन अंकुश संघटनेकडून गौरव

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील समाजसेवक स्वप्नील नरुटे यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याचा आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला.आंदोलन अंकुश संघटनेच्या शेतकरी वजन काटा येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी स्वप्नील नरुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.स्वप्नील नरुटे यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक शवविच्छेदन प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले आहे.विशेषतः त्यांनी सुमारे ३ हजारांच्या आसपास मृतदेहांचे अंत्यविधी निस्वार्थ भावनेने पार पाडले.कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक कुटुंबे असहाय्य झाली असताना स्वप्नील नरुटे हे धावून गेले आणि मानवतेचे दर्शन घडवले.कोणतेही व्यसन न करता,कोणताही आर्थिक लाभ न पाहता,केवळ समाजाप्रती असलेल्या जबाबदारीतून त्यांनी हे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे.मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना मानसिक आधार देणे,अंत्यविधीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे हे काम त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केले आहे.आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्वप्नील नरुटे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना सलाम केला. त्यांच्या या कार्यामुळे समाजात माणुसकी जिवंत असल्याचा विश्वास निर्माण होत असून तरुण पिढीसमोर एक आदर्श उभा राहिला आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमास आंदोलन अंकुश संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वप्नील नरुटे यांच्या या सामाजिक कार्याला आंदोलन अंकुश संघटनेसह संपूर्ण शिरोळ तालुक्याच्या वतीने मनापासून सलाम करण्यात आला.

Leave a Comment

error: Content is protected !!