पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
नागांव ता हातकणंगले येथील 4 फौंडेशनच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व अमित पांडे यांच्या हस्ते करण्यात आले . या शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी महात्मा गांधी हॉस्पीटल ब्लड सेंटर नवे पारगाव यांचे सहकार्य लाभले . यावेळी गायकवाड म्हणाले कि केवळ उत्सव साजरा न करता रक्तासारख्या मौल्यवान घटकाचे दान करून रुग्णांचे प्राण वाचवण्याचे कार्य यापल्या मंडळाकडून करत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे असे ते म्हणाले .या रक्तदान शिबिरास तरुणांचा व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासत आपला वर्धापन दिन विधायक मार्गाने साजरा केला. यावेळी महात्मा गांधी हॉस्पीटल ब्लड सेंटर नवे पारगाव डाॅक्टर व फौंडेशनचे शुभम कांबळे दत्ता कांबळे श्रवण कुरणे विजय कांबळे, शुभम वडार , गौरव समुद्रे , प्रकाशदीप शिर्के, यश वडार, कुणाल वडार, विक्रांत माने , विशाल कांबळे, रितेश कांबळे, अमित कांबळे, आशिष कुरणे , वैष्णव कांबळे आदीसह उपस्थित होते .