शिरोळ शहर लिंगायत तेली समाज अध्यक्ष पदी चंद्रकांत कोरे (नाना) यांची बिनविरोध निवड 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ शहर लिंगायत तेली समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक वीरभद्र बंडोबा फल्ले यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत समाजाच्या पंचवार्षिक नोंदणीकृत मंडळाची सर्वानुमते निवड करण्यात आली.समाजाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी व सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासासाठी हे मंडळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.या नोंदणीकृत मंडळाच्या अध्यक्षपदी समाजाचे ज्येष्ठ व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व चंद्रकांत आप्पा कोरे (नाना) यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी मनोहर बंडोबा फल्ले यांची जबाबदारी सोपवण्यात आली असून खजिनदार म्हणून राजेंद्र महादेव माळकर यांची निवड करण्यात आली आहे. सेक्रेटरीपदी संजय बाळासो चिकोडे यांची निवड झाली असून कार्याध्यक्ष म्हणून रणदिवे सर यांची नियुक्ती करण्यात आली. सहकार्याध्यक्षपदी सतीश कोरे, ऑडिटर म्हणून राहुल फल्ले तर सह – ऑडिटर म्हणून बाबुराव गच्चे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याशिवाय समाजाच्या संचालकपदी राजाराम फल्ले, प्रशांत राजमाने, संतोष कारदगे, पपू फल्ले, विनायक फल्ले, मोहन फल्ले, राहुल फल्ले, महेश कोरे, पपू चिकोडे, अशोक फल्ले, अरुण कोरे, रविंद्र देशमाने,श्रीकांत देशमाने, वीरभद्र फल्ले व सोमनाथ चिकोडे यांची निवड करण्यात आली.नवीन मंडळाच्या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले. अध्यक्ष चंद्रकांत आप्पा कोरे यांनी समाजातील तरुणांना एकत्र घेऊन शिक्षण, व्यवसाय, सामाजिक सलोखा आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.या बैठकीस समाजातील ज्येष्ठ, तरुण व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

Leave a Comment

error: Content is protected !!