नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी घेतली मा आ उल्हास पाटील यांची सदिच्छा भेट

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

जयसिंगपूर नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी माजी आमदार उल्हासदादा पाटील यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.या भेटीदरम्यान माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.या भेटीचे शिरोळ व जयसिंगपूर परिसरातील राजकीय व सामाजिक वर्तुळात स्वागत करण्यात आले.या प्रसंगी शिरोळ शहरातील विविध विकास कामांबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा,रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता,नागरी सुविधा तसेच भविष्यातील विकास आराखड्यावर चर्चा झाली.माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी आपल्या अनुभवातून महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या आणि विकासकामांना गती देण्यासाठी मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शिरोळ शहराचा विकास हा प्राधान्यक्रमावर असून,केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ शहराला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच जयसिंगपूर व शिरोळ शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली.या सदिच्छा भेटीप्रसंगी संजय ताराप – माने, संभाजी मोरे, नेताजी संकपाळ, अमोल हिरेमठ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.या भेटीमुळे आगामी काळात शिरोळ शहराच्या विकासकामांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!