उपनगराध्यक्षपदासाठी सौ अनिता संकपाळ यांचे नाव आघाडीवर, आघाडीचे वरिष्ठ नेते निष्ठावंतांना न्याय देणार ?

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शहरातील राजकारणात मोठा बदल दिसून आला आहे. शिरोळ शहरात शिव शाहू पुरस्कृत यादव पॅनेलने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्ष पदासह तब्बल १५ नगरसेवक निवडून आणले असून, त्यामुळे शिरोळ नगरपरिषदेवर आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे.प्रचारादरम्यान आघाडीने भ्रष्टाचारमुक्त कामकाज,सर्वसामान्य जनतेसाठी विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे ठळक आश्वासन दिले होते.या विजयानंतर शिरोळ शहरातील राजकीय वातावरण उपनगराध्यक्ष पदासाठी जोरदार चर्चेत आहे.सध्या उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार,याकडे शिरोळ शहराचे लक्ष लागले आहे.उपनगराध्यक्ष पदासाठी संकपाळ कुटुंबातील सौ.अनिता गजानन संकपाळ याचे नाव आघाडीवर असल्याचे सूत्राकडून मिळत आहे.संकपाळ कुटुंब गेली ४१ वर्षे राजकारणात सक्रिय असून, माजी सरपंच गजानन संकपाळ हे विजय – पराजय काळात यादव गटाशी एकनिष्ठ राहिले आहे.राजकीय आणि सामाजिक अनुभव,सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ,संघटनात्मक क्षमता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीच्या काळात पाठीशी उभे राहू आधार देण्याची भूमिका आणि जनतेच्या मनातील स्वयंभू नेतृत्व यामुळे प्रभाग क्रमांक २ मधून सौ अनिता गजानन संकपाळ यांना पुन्हा निवडून देऊन काम करण्याची संधी मिळाल्याने, गजानन संकपाळ यांच्या पत्नी सौ अनिता गजानन संकपाळ यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.शिव शाहू आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून उपनगराध्यक्ष पदासाठी न्याय देईल ? याकडे शिरोळ शहराचे लक्ष लागून राहिले आहे.शहरातील राजकीय तज्ज्ञांचे मतानुसार आघाडीच्या स्पष्ट बहुमतामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी होणारी निवड आघाडीच्या इच्छेनुसार ठरेल.त्यामुळं शिरोळ नगर परिषदेवरील सत्ता बदलाची लाट शहराच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण करीत असून, आघाडीचे प्रमुख उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची निवड करतात यावरून राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.मात्र उपनगराध्यक्ष पदाच्या नावाबाबत अद्याप शिव शाहू आघाडी पुरस्कृत यादव पॅनल कडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!