परिवर्तन घडवून शिरोळकरांनी इतिहास घडवीला : आ. सतेज पाटील

Spread the love

शिरोळच्या विकासासाठी कटिबद्ध: खा. शाहू महाराज

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळकरांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन घडवित लोकनियुक नागराध्यक्षासह १५ नगरसेवक निवडून आणून राज्यात इतिहास रचला. शहराच्या विकासासाठी सर्वच पदाधिकारी सदैव काम करून जनतेच्या विश्वासास पात्र राहतील अशी ग्वाही माजी मंत्री व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिली. शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य व केंद्रातून निधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे आश्वासन खासदार शाहू महाराज यांनी दिले.
शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत शिव-शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलच्या सौ. योगिता कांबळे यांनी सुमारे सहा हजाराचे मताधिक्य घेऊन विजय संपादन केला. तर युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव, सौ विदुला यादव, सौ अनिता संकपाळ, उल्हास आवळे, राहुल कोळी, विजय आरगे, सौ सविता पुजारी, सुरेखा कोरे, सौ दिपाली फल्ले, शरद उर्फ बापू मोरे, सौ. कल्पना काळे, दीपक भाट, सौ. अनुराधा गुरव, सौ सुवर्णा कांबळे, ओंकार माने गावडे यांनी विजय मिळवला नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते कोल्हापुर जिल्हा काँग्रेस कार्यालयात करण्यात आला.तर शिरोळकरांच्या वतीने खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दरगू गावडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष सचिन शिंदे यांनी शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत परिवर्तन घडविण्यासाठी खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सहकार्य केले. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत सत्तांतर झाले. यापुढेही एकमेकांच्या हातात हात घालून येणाऱ्या सर्व निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील राहूया असे आवाहन केले.यावेळी यादव पॅनेलचे प्रमुख राहुल यादव, योगेश सारस्वत, अविनाश कांबळे, नेताजी जाधव, मानसिंग पाटील, रावसाहेब माने, मजूर मिस्त्री, धनाजी पाटील नरदेकर, पदमसिंह पाटील, रुपेश मोरे, विठ्ठल पाटील, सौ. वर्षा मोरे, सौ. शोभा कांबळे, सुरेशराव फल्ले, अभय गुरव, परवेज मिस्त्री, सुनील फल्ले, चंद्रकांत भाट, ओंकार गावडे, निलेश गावडे, प्रशांत चुडमुंगे, भालचंद्र ठोंबरे, विजय पाटील, सचिन कोळी, विवेक फल्ले, बबन पुजारी, संतोष पुंदे, अभिजीत गुरव, अक्षय गवळी, अनंत माने, उमेश माने, यांच्यासह यादव पॅनेलचे नेतेमंडळी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट
यादव बंधूंचे परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम
गेल्या पाच वर्षापासून पृथ्वीराजसिंह यादव आणि राहुल यादव या बंधूनी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जनतेच्या संपर्कापासून उमेदवारीच्या निवडीपर्यंत परफेक्ट नियोजन करून करेक्ट कार्यक्रम करीत शिरोळ पालिकेत सत्ता आणली. यादव बंधूंच्या कार्याला यापुढेही माझ्यासह सर्व प्रमुख नेतेमंडळी सहकार्य करतील. केंद्र आणि राज्यातून निधी मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील जनतेच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून या पाच वर्षात कोणत्या प्रकारे कोणत्या वर्षी कोणती कामे केली जातील याची माहिती जनतेला देत जावी. त्यामुळे शहराचा विकास साधण्यास मदत होईल असा विश्वास आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!