प्रभाग ३ मधून राहुल कोळी यांचा दणदणीत विजय; नागरिकांचा विश्वास विकास कामातून सार्थ ठरणार

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

प्रभाग तीन मधील सर्वसामान्य कुटुंबांच्या मूलभूत सुविधा व दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी राहुल कोळी यांना प्रभाग तीन मधील नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.शिव शाहू पुरस्कृत यादव पॅनलचे उमेदवार म्हणून राहुल कोळी यांनी मिळवलेला हा विजय म्हणजे प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि अपेक्षांचा कौल मानला जात आहे.प्रभाग तीन मधील नागरिकांना आपला हक्काचा, जिवाभावाचा आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी असणारा प्रतिनिधी हवा होता.हीच भावना व्यक्त करत मतदारांनी राहुल कोळी यांना नगरपालिकेच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली आहे.शांत,संयमी स्वभाव,सामान्य माणसाशी असलेली आपुलकी आणि प्रश्न सोडवण्यासाठीची तत्परता यामुळे राहुल कोळी यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे चित्र दिसून आले.या निवडणुकीत यादव पॅनेलचे प्रमुख तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांनी एकजुटीने राहुल कोळी यांच्या पाठीशी उभे राहत विजय सुनिश्चित केला.पॅनेल प्रमुखांचा विश्वास आणि नागरिकांचा पाठिंबा यामुळेच हा विजय शक्य झाल्याचे बोलले जात आहे.प्रभागातील रस्ते,पाणीपुरवठा,स्वच्छता, आरोग्य,शिक्षण तसेच मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांवर ठोस काम होईल,अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.विजयानंतर प्रतिक्रिया देताना राहुल कोळी म्हणाले की,प्रभाग तीन मधील नागरिक, आघाडीच्या नेत्यांनी आणि माझ्या पॅनेलमधील सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे,त्याला मी नक्कीच पात्र राहीन. नगरपालिकेमध्ये मिळालेल्या संधीचा उपयोग करून विकासाभिमुख कामे केली जातील.सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे, प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे आणि प्रत्येक घटकाला न्याय देणे हेच माझे प्राधान्य राहील.या विजयामुळे प्रभाग तीन मध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांकडून राहुल कोळी यांच्याकडून विकासाची नवी सुरुवात होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात प्रभागाचा कायापालट घडवून आणण्यासाठी ते नक्कीच प्रयत्नशील राहतील, असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!