पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुलाची ( ता हातकणंगले )येथील दर्ग्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण डाॅक्टर जागीच ठार झाला.आईच्या डोळ्यावर औषधोपचार करण्यासाठीतीला गावाहून बोलावून घेतले होते पण माय लेकरांच्या भेटी आधीच नियतीने मुलास हिरावून नेले हा अपघात आज शनिवारी सकाळी ९ वाजण्यासुमार घडला. पोलिसातून घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहीती अशी कि मयत तरूणाचे नाव डाॅ.प्रसाद दिनकर बुगडे ( वय २९ रा मलिग्रे ता आजरा जि कोल्हापुर ) आहे .तो आज सकाळी पुणेहून मलिग्रेकडे जात असताना त्याच्या दुचाकी (क्र. एम एच ०९ जी व्ही ८०५९ ) ला जात असताना पंचगंगा नदी येथील पिर दर्ग्याजवळ अज्ञात ट्रकने त्याच्या दुचाकीस जोराची धडक दिली . त्यात तो जागीच ठार झाला.प्रसाद याला तिन बहीणी असून त्याच्या वडीलांचे सहा वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. प्रसाद हा अभ्यासात हुशार होता. त्याचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण गावातच झाले तर १२ वीचे शिक्षण गडिहग्लज तर वैद्यकीय शिक्षण कवठेमहांकाळ येथे पुर्ण केले होते. तो आपल्या डाॅक्टर बहीनीकडे मिरज येथे राहत होता बहिणीनेच त्याचे वैद्यकीय शिक्षण पुर्ण केले होते .प्रसाद याच्या आईच्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी त्याने आईला गावावरून फोन करून तावडे हॉटेल येथे येण्यास सांगितले होते तेथून ते दोघे मोटरसायकलवरून कणेरीमठ येथे उपचारासाठी जाणार होते पिर दर्गा ते तावडे हॉटेल असे एक किलोमीटर चे अंतर राहीले असतानाच आईच्या भेटी विनाच प्रसादचा अपघाती मृत्यू झाला . प्रसाद हा कुटुंबात सर्वात लहान असला तरी त्याच्या कुटुंबीयांची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती.