भैरववाडी / प्रतिनिधी
भैरववाडी येथील शिंदे कॉर्नर परिसरात असलेल्या हॉटेल शिवशाही गावरान यांनी ग्राहकांसाठी एक खास मेजवानी सुरू केली आहे.येत्या प्रत्येक रविवारी हॉटेल शिवशाही गावरान येथे केवळ २०० रुपयांत अनलिमिटेड चिकन थाळी मिळणार असून,ही ऑफर परिसरातील नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.विशेष म्हणजे ग्राहक १ किलो चिकन खावा किंवा १० किलो चिकन खावा,कोणतीही मर्यादा न ठेवता ही थाळी पूर्णपणे अनलिमिटेड स्वरूपात दिली जाणार आहे.हॉटेल शिवशाही गावरानची ओळख ही घरगुती पद्धतीच्या, चुलीवर तयार होणाऱ्या अस्सल गावठी चवीसाठी आहे.पारंपरिक मसाल्यांचा वापर, ताजे आणि दर्जेदार चिकन,तसेच स्वच्छता आणि दर्जा यावर विशेष भर दिला जातो.त्यामुळे येथील जेवणाला परिसरातील ग्राहकांची नेहमीच पसंती मिळत आली आहे. आता रविवारी अनलिमिटेड चिकन थाळीची सुविधा सुरू केल्याने चिकनप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.या अनलिमिटेड थाळीमध्ये चविष्ट चिकन रस्सा,चिकन तुकडे, भाकरी/चपाती,रोटी,कांदा-लिंबू अशा घरगुती जेवणाचा संपूर्ण आस्वाद मिळणार आहे. चुलीवर शिजवलेल्या या पदार्थांचा खास गावठी स्वाद ग्राहकांना घरच्या जेवणाची आठवण करून देतो,असे अनेक ग्राहकांचे मत आहे.हॉटेल व्यवस्थापनाच्या माहितीनुसार,ही योजना सामान्य कुटुंबे,कामगार वर्ग,मित्रपरिवार तसेच चिकनप्रेमींसाठी अतिशय किफायतशीर असून, दर्जेदार आणि पोटभर जेवण देण्याचा त्यांचा उद्देश आहे.रविवारी सुट्टीच्या दिवशी कुटुंबासह किंवा मित्रांसोबत एकत्र येऊन चविष्ट जेवणाचा आनंद घेण्यासाठी हॉटेल शिवशाही गावरान हे उत्तम ठिकाण ठरत आहे.घरगुती पद्धतीचे, चुलीवरचे चविष्ट आणि स्वादिष्ट जेवण अनुभवण्यासाठी नागरिकांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी,असे आवाहन हॉटेल शिवशाही गावरानच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता : हॉटेल शिवशाही गावरान, शिंदे कॉर्नर, भैरवाडी. मोबा.9921456195,9420247170