पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
टोप येथील क्रशर परिसरात सोमवारी रात्री गव्यांच्या कळपाचे दर्शन झाल्याने येथे काम करणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .या गव्यांच्या कळपाचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.सध्या सादळे मादळे डोंगर भागात मोठ्या प्रमाणात गव्यांच्या कळपाने थांडमाडून बसले असताना रात्री हातकणंगले तालुक्यातील टोप येथील पश्चिम बाजूला असलेल्या क्रशर परिसरात काही प्रमाणात गव्यांच्या कळपाचे दर्शन झाल्याने नागरिकात घबराट निर्माण झाली आहे. गेल्या वर्षांभरापासून सादळे मादळे, कासारवाडी, गिरोली, अंबपवाडी परिसरात गव्यांच्या कळपाचा वावर असल्याने या कळपाने येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच रात्री आठच्या सुमारास भोसले खडी (शिवाजीनगर) च्या बाजूला असलेल्या क्रशर कडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन गव्यांचा कळप दृष्टिस पडल्याने नागरिकात घबराट निर्माण झाली आहे. गव्यांच्या या कळपाचा गावातील व्हिडिओ सोशल मीडिया ग्रुप वर व्हायरल झाला असून त्या परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.पण कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार घडण्या आदी वनविभागाने या गव्यांचा शोध घेवून वन आदिवासात सोडण्यासाठी प्रयत्न केला पाहीजे अशी नागरिकातून मागणी होत आहे.