शिरोळच्या सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक जडणघडणीत लडगे कुटुंबाचे मोठे योगदान – मंत्री चंद्रकांत दादा पाटील

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधून प्रमोद लडगे तर प्रभाग क्रमांक ९ मधून सौ.भाग्यश्री लडके हे भाजपच्या चिन्हावर उमेदवार म्हणून मैदानात उतरले असून,त्यांच्या उमेदवारीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शिरोळ शहरातील आयोजित प्रचार सभेत राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या दोन्ही उमेदवारांबाबत आपला विश्वास व्यक्त करत भाजप पक्ष अशा एकनिष्ठ,कार्यकर्तेप्रधान आणि समाजाभिमुख व्यक्तींना नेहमीच योग्य स्थान व प्रोत्साहन देईल,असे सांगितले.शिरोळ शहराच्या सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक जडणघडणीत लडगे कुटुंबाचे दीर्घकाळापासून मोठे योगदान राहिले आहे.कठिन प्रसंगी मदतीचा हात देणे,वैयक्तिक अडचणींमध्ये सामान्य नागरिकांना आधार देणे आणि गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणण्याचे कार्य लडगे परिवाराने सातत्याने केले असल्याचा उल्लेख मंत्री पाटील यांनी केला.या पार्श्वभूमीवर शिरोळची जनता लडगे कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.प्रचार भेटी दरम्यान मंत्री पाटील यांनी प्रभाग क्रमांक ८ व ९ मधील सर्व मतदारांना आवाहन केले की, विकासाभिमुख दृष्टीकोन, शिरोळचा सर्वांगीण विकास आणि नागरिकहिताच्या कामांसाठी कटिबद्ध असलेल्या प्रमोद लडगे व भाग्यश्री लडके यांना प्रचंड मतदान करून विजयी करावे. गेली अनेक वर्षे सामाजिक कार्याची सातत्यपूर्ण सेवा,स्थानिक पातळीवरील संपर्क तसेच भाजपमधील वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांच्या जोरावर दोन्ही उमेदवारांना व्यापक पाठींबा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.स्थानिक नागरिक,युवा वर्ग आणि महिला मतदारांच्या विविध सभांतही लडगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,दोन्ही प्रभागांमध्ये निवडणूक वातावरण चैतन्यमय झाले आहे.विकासाच्या दिशेने स्थिर आणि सक्षम नेतृत्व देण्याच्या निर्धारासह प्रमोद लडगे व सौ.भाग्यश्री लडके प्रचारयात्रेत सक्रियपणे सहभागी होत असून,घराघरात पोहोचून मतदारांशी संवाद साधत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!