शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील राहुल अनिल कोळी यांना शिव शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेल मधून नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.त्यांच्या शांत,निस्वार्थी आणि संघटन कौशल्याच्या जोरावर या प्रभागातील नागरिकांनी त्यांना प्रचंड पाठिंबा दर्शवला आहे.राहुल कोळी यांनी या प्रभागातील अनेक वर्षांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेतल्या असून,प्रत्येक तळागाळातील प्रश्नाची सखोल माहिती असून तो सोडवण्याच्या दृढ संकल्पाने उमेदवारी स्वीकारली आहे. नागरिकांच्या मते,प्रभागातील याआधीच्या निवडणुकांमध्ये निवडलेले प्रतिनिधी तळागाळातील वास्तव समस्यांवर लक्ष देण्यात कमी पडत होते. या पार्श्वभूमीवर,राहुल कोळी यांची उमेदवारी प्रभागातील लोकांसाठी नव्या आशेचे चिन्ह ठरली आहे. प्रभागातील नागरिकांनी एकमताने सांगितले की, प्रत्येक वेळी फक्त एकच उमेदवार का? असा सवाल उपस्थित करून या वेळी परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प केला आहे.राहुल कोळी यांच्या उमेदवारीने प्रस्थापित राजकीय नेतृत्वाला मोठे आव्हान दिले असून, या निवडणुकीत प्रभागातील मतदारांनी बदलासाठी ठाम निर्णय घेतला आहे. राहुल कोळी यांनी सांगितले की, मला प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या समस्यांची जाण आहे,त्या मूलभूत समस्या सभागृहात जाऊन निराकरण करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. माझ्या प्रभागातील प्रत्येक घर,प्रत्येक नागरिक माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांच्या या सकारात्मक आणि कार्यक्षम दृष्टिकोनामुळे प्रभागातील अनेक मतदारांनी उमेदवाराला सामोरे जाऊन त्याला संपूर्ण पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे.शिरोळ प्रभाग ३ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.राहुल कोळी यांच्या पाठीशी सर्वसामान्य मतदारांसह युवा वर्गांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे.