पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
मोटरसायकल रस्त्यात थांबवून मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून दोन युवा उद्योजकांची एकमेकाना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण तर फॉर्च्यूनर गाडीचे नुकसान शुल्क कारणावरून दोन युवा उद्योजक एकमेकांना भिडल्याची औद्योगिक वसाहतीमधील पहिलीच घटना. याबाबत पोलिसांत परस्पर विरोध तक्रार दाखल करण्यात आला आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील दत्त फॉन्ड्री समोर आज दुपारी बारा वाजण्यासुमारास अमर प्रताप पाटील ( वय 36 रा. पाटील गल्ली पुलाची शिरोली ता. हातकणंगले ) हा मोटरसायकल वरून आपले कारखान्याकडे जात होता फोन आलेने रस्त्याच्या कडेला बोलत थांबला असता रोहित बोडके ( वय -34 रा.दत्त फॉन्ड्री शिरोली ) हे आपल्या फॉर्च्यूनर गाडी (क्र. MH09-FG-1122) ने आले असता त्याने अमर पाटील यास तू रस्त्यावर का बोलत उभारला आहेस बाजूला हो असे म्हणून दत्त फॉन्ड्री जवळ गेले असताना पाटील यांनी तेथे जावून काय झाले मी रोडच्या कडेला फोनवर बोलत होतो असे समजावून सांगत असताना रोहित बोडके याने पाटील याना वाईट वंगाळ शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद अमर पाटील यानी दिली आहे .तर रोहित सुनिल बोडके यानी अमर पाटील यास मोटरसायकल रस्त्याच्या कडेला थांबवून फोनवर बोला असे सांगून ते आपले दत्त फौंड्री जवळ आले असता अमर पाटील याने रोहीत बोडके यांचा पाठीमागून दत्त फौंड्री येथे येवून बोडके यास वाईटवंगाळ शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करत पुन्हा मारण्याची धमकी देवून जवळच पडलेल्या लाकडी ओंडक्याने बोडके यांची फॉर्च्यूनर गाडीचे पुढील बाजूची काचेवर व उजव्या बाजूच्या मागील काचेवर लाकडी दांडके मारून नूकसान केले असे बोडके यानी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे . याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.