मांत्रिक किशोर लोहार व अभिजित मोहिते यांची गावातून फिरवत काढली धिंड

Spread the love

मध्यरात्री अघोरी अशी पूजा करणाऱ्या मांत्रिक किशोर लोहार व अभिजित मोहिते यांची गावातून फिरवत धिंड काढली तर न्यायालयाने आज एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली

 

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी अशी पूजा करणाऱ्या मांत्रिक किशोर लोहार व अभिजित बाबासो मोहिते या दोघांची शिरोली पोलिसांनी गावातून फिरवत धिंड काढत आज शुक्रवारी परत न्यायालयात हजर केले असता त्याना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली .

 

गेली १५ दिवसापासून फरार असणारा मांत्रिक किशोर लोहार व व्हिडिओ चित्रीकरण करणारा अभिजित मोहिते यास गुरुवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती यावेळी त्यांच्याकडून अन्य काही संशयास्पद माहीती मिळते का पाहण्यासाठी परत आज शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता परत न्यायालयातने त्याना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली . त्यानंतर लोहार व मोहिते याना गावातून फिरवत त्यांची धिंड काढत अशा प्रकारे कोणही लोकांची दिशाभूल करणारे प्रकार व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्यांची गय केली जाणार नाही त्यांची अशीच धिंड काढण्यात येईल असा संदेश शिरोली पोलिसांकडून देण्यात आला .

Leave a Comment

error: Content is protected !!