पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरो ली येथील स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी अशी पूजा करणाऱ्या फरार मांत्रिकासह अन्य एकास ताब्यात घेतले तर ज्यासाठी पुजा केली तो आजारी असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता , सोशल मीडियावर आजार बरा होणारी रिल्स पाहून ही पुजा केल्याचे तपासात निष्पन्न , गुरूवारी आरोपीना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे तपास अधिकार्यानी सांगितले शिरोली गावातील स्मशानभूमीत अघोरी पूजा करून बाटलीत आत्मा बंद केला असून, दोन दिवसांत त्याचे रिझल्ट मिळतील’ असे मांत्रिक किशोर लोहार बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर वाऱ्यासारखा वायरल झाला होता त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती त्यानुसार शिरोली पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता या घटनेपासून किशोर लोहार हा फरार होता शिरोली पोलिस त्याचा शोध घेत असताना आज किशोर लोहार शिरोली पुलाची येथे घरी सापडला व्हिडिओ चित्रीकरण करणारा मौसम ( अभिजीत ) पुर्ण नाव समजू शकले नाही याला ही ताब्यात घेतले पण ज्याच्यासाठी पुजा केली तो रमेश गावकर याला अद्यापही ताब्यात घेतले नाही .गावकर व किशोर लोहार यांची ओळख शिरोली सांगली फाटा येथे झाली गावकर हे सहा वर्षापासून पायाच्या आजारामुळे त्रस्त होते अनेक उपचार करून देखील तो आजार बर होत नसल्याने ते हतबल झाले होते सांगली फाटा येथे गावकर व लोहार यांची प्रवासादरम्यान ओळख झाल्याने विचारपूस केल्यानंतर लोहार याने स्मशानभूमीत अशा प्रकारची पुजा केल्याने आजार बरा होतो असा मि सोशल मीडियावर व्हिडिओ पाहीला आहे . आणी मि एक पुजारी असून अशा प्रकारची पूजा मि करतो असे सांगून गावकर यास २७ ऑक्टोबरच्या दरम्यान शिरोली स्मशानभूमीत बोलावून ही पुजा केली त्याचा व्हिडिओ चित्रीकरण मोसम ( अभिजीत) यास करण्यास सांगली होता त्यानुसार अभिजीत याने व्हिडिओ चित्रीकरण करून तो अन्य लोकांना पाटवल्याने या पुजेचे गुपित पुढे आले आज किशोर लोहार व मोसम ( अभिजीत) यास शिरोली पोलिसानी ताब्यात घेवून त्यांकडे कसून चौकशी करत आहेत या चौकशी दरम्यान अन्य पुजेचे गुपित पुढे येण्याची दाट शक्यता आहे .