ताराराणी आघाडी मधून सौ.शारदा सुनिल माने शिरोळ नगरपरिषदेच्या रिंगणात 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून भाजप पुरस्कृत ताराराणी आघाडीच्या उमेदवार म्हणून सौ.शारदा सुनिल माने या रणांगणात उतरल्या आहेत.सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सामाजिक कार्याची आवड असलेल्या सौ.माने यांनी अल्पावधीतच प्रभागातील महिलांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सौ.माने या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून विविध समाजोपयोगी कामांमुळे त्यांनी लोकांमध्ये विश्वासार्हता मिळवली आहे. महिलांच्या स्वावलंबनासाठी घेतलेल्या प्रयत्नांमुळे त्यांचे कार्य विशेषत्वाने अधोरेखित होते.प्रभागातील मूलभूत सुविधा,स्वच्छता, रस्त्यांची देखभाल,पिण्याचे पाणी आणि ड्रेनेज समस्या या सारखे प्रश्न प्रलंबित आहेत.शिरोळ नगरपरिषद ही सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी कार्य करणारी संस्था असावी. प्रभाग क्रमांक ४ मधील प्रत्येक मतदाराचा सहभाग घेऊन विकासाची गंगा वाहविणे,हे माझे ध्येय आहे.लोकांच्या समस्या जाणून त्यावर ठोस तोडगा काढणारा आणि जनतेशी थेट संवाद ठेवणारा हक्काचा लोकप्रतिनिधी असावा,अशी माझी भूमिका आहे,असे मत सौ.शारदा माने यांनी व्यक्त केले.भाजप पुरस्कृत ताराराणी आघाडीच्या माध्यमातून सौ.माने या विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनाचे आश्वासन मतदारांना देत आहेत. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महिला शक्ती आणि युवा वर्गाचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे, असे त्या म्हणाल्या.प्रभागातील नागरिकांनी सौ.माने यांना चांगला प्रतिसाद दिला असून त्यांच्या प्रचाराला उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे.महिलांपासून ते युवकांपर्यंत सर्वच घटकांमध्ये त्यांच्या उमेदवारीची चर्चा असून सुशिक्षित, समर्पित आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून सौ.शारदा माने यांच्याकडे नागरिक आशेने पाहत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!