कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार – जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांचा (राष्ट्रवादी शरद पवार) बैठकीत निर्धार

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून,प्रत्येक कार्यकर्त्याच्या योगदानाची दखल घेणारा पक्ष आहे.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांनी व्यक्त केला. शिरोळ येथे नुकतीच झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणी पदाधिकारी संवाद बैठकीत ते बोलत होते.बैठकीत जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.अनिल घाटगे, कोल्हापूरचे माजी महापौर व शहराध्यक्ष आर. के.पवार,शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, जयसिंगपूर शहराध्यक्ष पै.चंद्रकांत जाधव (घुणकीकर) यांच्यासह जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“पवार साहेबांच्या विचारांवर जनतेचा विश्वास”

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.अनिल घाटगे म्हणाले, “परवाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मिळालेल्या ९३ हजार मतांपैकी पन्नास टक्के मते ही शरद पवार साहेबांच्या विचारसरणीला मिळालेली आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा कार्यकर्ता हाच खरा पवारसाहेबांचा सच्चा शिलेदार आहे. शिरोळ तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांसोबत काम करताना राष्ट्रवादी जास्तीत जास्त जागा आपल्या खात्यात पाडून घेईल, असा विश्वास मला आहे.”

“कार्यकर्त्यांना न्याय देणं हे आमचं कर्तव्य”

माजी महापौर आर.के.पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महाविकास आघाडी म्हणून आमचे घटक पक्षांशी उत्तम समन्वय आहे.पक्षातील इच्छुक उमेदवारांचे मत आजमावून घेऊन त्यांना न्याय देण्याची वेळ आली आहे. ज्यांनी तळागाळात काम करून पक्षाला बळकटी दिली, अशा कार्यकर्त्यांना बळ देणं हे आपलं कर्तव्य आहे.”

“पवारसाहेबांचे तालुक्याशी भावनिक नाते”

तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे म्हणाले, “शिरोळ हा पुरग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. 2005, 2019 आणि 2021 च्या महापुरात तालुक्याची वाताहत झाली होती. त्यावेळी शरद पवार साहेबांनी स्वतः तालुक्यात दहा दिवस मुक्काम ठोकला.त्यांनी 15 ऑगस्टचा ध्वजारोहण सोहळा टाकळीच्या माळावर केला होता.तो प्रसंग येथील जनता कधीही विसरणार नाही.अनेक नेते तालुक्याला सोडून गेले,पण जनतेने मात्र आजही पवारसाहेबांच्या विचारांशी निष्ठा ठेवली आहे.”ते पुढे म्हणाले, “कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. त्याच्यावर अन्याय होऊ नये, हे जिल्हाध्यक्षांनी पाहावे. कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत.”

“कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे”

अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, “येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पक्षासाठी जिवाचे रान करणाऱ्या इच्छुकांना न्याय देण्याचे काम करणार आहे. तालुका अध्यक्ष जगदाळे व सर्व पदाधिकारी यांच्या कामाबद्दल मी समाधानी आहे. उमेदवार निवडताना त्यांना विश्वासात घेतले जाईल.”

“सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणं हेच आमचं कर्तव्य”

जयसिंगपूर शहराध्यक्ष व माजी नगरसेवक पै.चंद्रकांत जाधव (घुणकीकर) म्हणाले, “मी डाव्या विचारसरणीचा माणूस आहे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठीच नेहमी लढत आलो आहे. जनता आपल्या पाठीशी यावी यासाठी त्यांच्या समस्यांसाठी झटणं आवश्यक आहे. सन 1991 साली मी एकही पैसा खर्च न करता नगरसेवक झालो. हे उदाहरण दाखवते की जनतेच्या विश्वासावर निवडून येणं शक्य आहे. आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि त्यांना बळ देणं हे पक्षाचे कर्तव्य आहे.”

“कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह”

यावेळी तालुका युवक अध्यक्ष नागेश कोळी, कॉम्रे. पांडुरंग गायकवाड, महिला उपाध्यक्षा सुमन चव्हाण, मौला पटेल, अरुण भंडारे, निशांत निटवे, किरण कुरणे, उपाध्यक्ष राजगोंड पाटील, तेजप्रताप माने आदींनी मनोगते व्यक्त केली. सर्व वक्त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करीत आगामी निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी दिनेश कांबळे,नितीन चव्हाण, प्रकाश आलासे, शुभम पाटील, प्रशांत कदम, सलमान शेख, रुषिकेश पाटील, गरगरे सर, तात्यासाहेब शिरट्टी,अरुण पाटील,सतीश भंडारे, विरेंद्र नांद्रेकर, धनाजी नाईक यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन कोषाध्यक्ष डी.पी.कदम सर यांनी केले.प्रास्ताविक विधानसभा अध्यक्ष विशाल जाधव यांनी तर आभार प्रदर्शन शिरोळ शहराध्यक्ष संदीप मोरे यांनी केले.

“एकजुटीने लढा देऊया”

बैठकीच्या शेवटी जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले की,शरद पवार साहेबांच्या विचारधारेखाली एकजुटीने,निष्ठेने आणि जनतेशी प्रामाणिक राहून काम करूया. शिरोळ तालुका पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या झेंड्याने फडकवूया.

Leave a Comment

error: Content is protected !!