शिरोळ नगराध्यक्ष पदासाठी सौ.श्वेता विश्वास काळे यांची उमेदवारी ठरतेय केंद्रस्थानी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण यंदा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी झाले असून,या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.जनतेच्या आग्रहास्तव व स्वाभिमानी शिरोळकरांच्या भावनेचा आदर राखत सौ. श्वेता विश्वास काळे या निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.सौ.श्वेता काळे यांचे पती विश्वास उर्फ दादासाहेब काळे हे शिरोळच्या राजकारणात आणि सामाजिक चळवळीत मोठे योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.मागील तीन दशकांपासून त्यांनी शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी अनेक चळवळी केल्या आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी त्यांनी ‘चाबूकफोड आंदोलन’ उभारले होते, जे संपूर्ण महाराष्ट्रात गाजले. या आंदोलनामुळे शिरोळ तालुक्यात आजही जप्ती, लिलाव किंवा सक्तीची वसुली यासारखे प्रकार होत नाहीत, हे विशेष.दादा काळे हे कोणत्याही राजकीय पदाविना गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून, गरजू नागरिकांच्या मदतीस तत्पर असतात. त्यांच्या कार्याचा व्यापक अनुभव आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेता, श्वेता काळे यांची उमेदवारी ही फक्त राजकीय डावपेच नसून, शिरोळच्या स्वाभिमानाची लढाई असल्याचे स्थानिक नागरिक मानतात.दरम्यान, विश्वास काळे यांनीही शहरात जनतेची मते जाणून घेण्यास सुरुवात केली असून, “शिरोळकरांच्या पाठिंब्यावरच हा निर्णय घेणार,” असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सौ.श्वेता विश्वास काळे या नगराध्यक्ष पदासाठी अधिकृतपणे रिंगणात उतरणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.राजकीय अभ्यासकांच्या मते, सौ. श्वेता काळे यांचा उमेदवारीचा निर्णय झाल्यास ही निवडणूक शिरोळच्या राजकारणात ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.

 

सौ.श्वेता विश्वास काळे या स्वतः उच्चशिक्षित असून त्यांना शिरोळ शहरातील सामाजिक प्रश्नांची जाण आहे.विशेषतः शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन हे प्रश्न सोडवण्याबरोबरच शहरवासीयांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण करतील अशी शिरोळ शहरवासीयांना अपेक्षा आहे. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत रचनात्मक व विकासात्मक शहर म्हणून शिरोळ शहराची ओळख निर्माण करून भ्रष्ट्राचार मुक्त, स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शक कारभार यासाठीच त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी,अशी भावना समस्त शिरोळकर व्यक्त करीत असल्याचे पाहायवास मिळत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!