दत्तवाडमध्ये दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, दोन आरोपींना अटक

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

 

कुरुंदवाड पोलिसांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे टाकून दोन जुगार चालकांना अटक केली आहे.या कारवाईत एकूण ३,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य समाविष्ट आहे.पहिली कारवाई दत्तवाड येथील खंडोबा मंदिरासमोरील एका खोलीत करण्यात आली.येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ धाड टाकली. समीर अल्लाउद्दीन काले (वय २६, रा. मानेनगर, दत्तवाड) याला अटक करून त्याच्याकडून १,७०० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.तर दुसऱ्या कारवाईत,दत्तवाड येथील सरकारी दवाखान्याजवळील एका खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.यामध्ये नूर कासिम काले (वय ४२, रा. दत्तवाड) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १,६२० रुपयांची रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे.या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस उपनिरीक्षक नितीन पुंडलिक साबळे यांनी तक्रार दाखल केली असून,महाराष्ट्र जुगारबंदी कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.पुढील तपास पोलीस हवालदार कराडे करत आहेत.या कारवाईमुळे बेकायदेशीर जुगार व्यवसायिकात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!