शिरोळ / प्रतिनिधी
हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेल्फेअर असोसिएशनच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी श्री. महेश मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सचिव दीपक मोतीलाल भामरे (जळगाव) यांच्या शिफारसीनुसार आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैय्या भामरे तसेच अध्यक्ष नचिकेत भुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.श्री.महेश मोरे हे स्वतः एक अनुभवी हस्तशिल्प कारागीर असून, त्यांचा सामाजिक कार्यातील सहभाग व संघटनेप्रती असलेली निस्वार्थ निष्ठा लक्षात घेता त्यांची ही निवड करण्यात आली आहे.संस्थेचे नियम व अटी मान्य करून, ते शिरोळ तालुक्यात हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेल्फेअर असोसिएशनचे कार्य प्रभावीपणे पार पाडतील, अशी अपेक्षा संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.संस्थेच्या अधिकृत पत्रकानुसार, अध्यक्षपदाचा वापर श्री.मोरे यांनी जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष व राज्यस्तरीय कोअर कमिटीच्या मार्गदर्शनाखालीच कार्य करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.या निवडीबाबत श्री. महेश मोरे यांनी समाधान व्यक्त करत,“संस्थेने दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता, मी प्रामाणिकपणे कार्य करेन.कारागीर बांधवांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहीन,” असे आश्वासन दिले. हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने त्यांना हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.