महात्मा बसवेश्वरांच्या विचारातून निर्माण झालेला अनुभव मंडपाच्या धर्तीवर हे मंडप निर्माण होणार – खास.धैर्यशील माने

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी सुरेश कांबळे

महात्मा बसवेश्वरांच्या प्रेरणेतून अनुभव मंडपाची निर्मिती झाली आणि समाजातील विविध घटकांना आणि महिलांना सर्वोचपदावर काम करण्याची संधी उपलब्ध झाली.कुरुंदवाड शहरातील लिंगायत समाज सांस्कृतिक भवनच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातुन लिंगायत आणि बहुजन समाजातील मुलांना चांगल्या पदावर

विराजमान होण्यासाठी हे सांस्कृतिक भवन प्रेरणादायी ठरणार आहे.महात्मा बसवेश्वरांच्या विचारातून निर्माण झालेला अनुभव मंडपाच्या धर्तीवर हे मंडप निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन खास.धैर्यशील माने यांनी केले.

येथील पालिकेच्या गट क्रमांक १२७ मधील नियोजित लिंगायत समाज बहुउद्देशीय सांस्कृतिक भवनच्या भूमी पूजन व पायाभरणी समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात खासदार माने बोलत होते.अध्यक्षस्थानी पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे होते.संजय पाटील यड्रावकर,दत्त कारखान्याचे गणपतराव

पाटील,वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक स्वामी, पंचगंगा साखर कारखान्याचे पी.एम.पाटील,रजनीताई मगदूम,नगराध्यक्ष जयराम पाटील,रामचंद्र डांगे,रावसाहेब पाटील,मुख्याधिकारी आशिष चौहान आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना खासदार माने म्हणाले शिरोळ तालुक्यातील समस्त लिंगायत समाज बांधवांनी एकत्रित येऊन अनुभव मंडपाची उभारणी करण्याचा मानस केला आणि तो आज पूर्ण होताना आनंद होत आहे यासाठी आणखीन एक कोटी रुपयाचा निधी देणार असल्याची ग्वाही देत कुरुंदवाड शहराच्या अंतर्गत रस्त्यासाठी १ कोटी २० लाख रुपयांचा निधी देण्याची ग्वाही दिली.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना आम.कोरे म्हणाले
नवीन संसदेची पायाभरणी करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनुभव मंडपाची आठवण करून अनुभव मंडपाच्या आचार विचारावर या देशाची ही लोकसंसद काम करेल हा विचार त्यांनी मांडला.मंगळवेढ्यामध्ये बसवेश्वरांचे स्मारकाच्या

धर्तीवर शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील अनुभव मंडप हे एक महात्मा बसवेश्वरांच्या विचाराचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक मॉडेल खास.माने आणि आम.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून साकारल जाईल असे सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी चौहान यांनी सांस्कृतिक भवनची संकल्पना मांडली.स्वागत सदाशिव मगदूम,प्रास्ताविक अँड.देवराज मगदूम यांनी केले.

यावेळी इचलकरंजीचे माजी नगरसेवक रवी माने,बाळासाहेब भांदिगरे,बाळासाहेब दिवटे,माजी नगरसेवक जवाहर पाटील, अक्षय आलासे,अनुप मधाळे,चंद्रकांत मोरे,सुनील कुरुंदवाडे जयपाल कुंभोजे,हेमंत आवटी आदी उपस्थित होते.आभार सच्चिदानंद आवटी यांनी मानले.

कुरुंदवाड येथील समस्त लिंगायत समाज बांधवांच्या संस्कृती भवनच्या पायाभरणी शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना खास माने,व्यासपीठावर आम कोरे,संजय पाटील यड्रावकर,गणपतराव पाटील,पी.एम.पाटील,रजनीताई मगदूम आदी.

error: Content is protected !!