परिक्षेत प्रश्नाची उत्तरे सांगितल्याने काॅपी केल्याचा ठपका ठेवत परिवेक्षक व महिला उमेदवारावर गुन्हा दाखल 

Spread the love

परिक्षेत प्रश्नाची उत्तरे सांगितल्याने काॅपी केल्याचा ठपका ठेवत परिवेक्षक व महिला उमेदवारावर गुन्हा दाखल

 

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

क्लर्क कम टायपिस्ट ग्रुप सी हे पद मिळविणेसाठी परिवेक्षकानेच शेवटच्या पाच मिनीटात उमेदवारास प्रश्नाची उत्तरे सांगितल्याने काॅपी केल्याचा ठपका ठेवत परिवेक्षक व महिला उमेदवारावर शिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 

शिरोली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडुन क्लार्क कम टायपिस्ट ग्रुप सी भरती २०२५ ही ऑनलाईन पध्दतीन शिये ता. करवीर येथील आयओन डिजीटल झोन केंद्रात कॉम्प्युटर लॅब नंबर दोनमध्ये टीसीएस कंपनी मार्फत घेत असलेल्या परिक्षा कक्षेत परिवेक्षक म्हणून काम पाहणारे ओंकार विजय कुमार जाधव ( रा. कसबा बावडा, कोल्हापुर ) यांनी परिक्षेस बसलेली उमेदवार किर्ती भिकाजीराव देसाई ( रा. शेलोली, ता. भुदरगड, जि. कोल्हापुर ) यांना शेवटच्या पाच मिनिटात काही प्रश्नांची उत्तरे सांगितल्याचे परिक्षा कक्षेत उपस्थित असणाऱ्या अन्य उमेदवारांनी हि घटना पाहील्याने त्यानी केंद्र प्रमुखांकडे तक्रार केली . केंद्र प्रमुखांनी परिक्षा कक्षेतील सिसिटिव्ही कॅमेरे तपासून पाहीले असता त्यांना परिवेक्षक ओंकार जाधव हे किर्ती देसाई या उमेदवार प्रश्नांची उत्तरे सांगत असल्याचे सिद्ध झाल्याने परिक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान कॉपी केली म्हणुन ओंकार जाधव व किर्ती देसाई यांच्या विरूद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, ३ [५] सह महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम १९८२ चे कलम ७ याचे उल्लंघन केले म्हणुन यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद प्रविण आनंदाराव बन्ने, ( वय २९ वर्षे, व्यवसाय नोकरी, [ टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस, कोल्हापुर ] रा. मिणचे, ता. हातकणगले जि. कोल्हापुर ) यानी दिली आहे .

error: Content is protected !!