1993 दहावी बॅचच्यावतीने सत्कार करण्यात आला
कोथळी / प्रतिनिधी
घरोघरी जाऊन महिलांना पोस्ट खात्यात बचतीचे महत्त्व सांगून बचत करण्याने पुढची पिढी घडते अखंड 21 वर्षे फिरून आरडी गोळा करून पोस्टाचे बचत करण्याचे महत्त्व सांगणाऱ्या सुनीता शामराव मगदूम हिला कोथळी ग्रामपंचायतीचा अहिल्याबाई होळकर स्त्री सन्मान पुरस्कार म्हणजे स्त्री जातीचा योग्य सन्मान आज या ग्रामपंचायतीने केला आहे असे मत आदर्श विद्यालय कोथळीचे माजी महावीर चकोते सर बोलताना व्यक्त केले ते 1993 दहावी बॅच यांच्या सुनिता मगदूम सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते
ते पुढे म्हणाले सुनिता मगदूम ही घरात शिलाई मशीन शिवते त्याचबरोबर साखरशाळा असो किंवा उसाच्या शेतात शाळा भरवत असते त्याचबरोबर पोस्टाचे खात्याच्या आर .डी बचत विषयी महिलांना समजावून सांगून बचतीचे महत्त्व पटवून देत गावात वाड्या वस्तीत फिरून आर .डी गोळा करत पोस्टाचे पैसे कसे सुरक्षित आहेत हे पटवून देऊन ती यात यशस्वी झाली आहे त्यामुळे स्त्री सन्मान पुरस्कार हा सुनीता मगदूम हिचा योग्य सन्मान झाला आहे
यावेळी मनोगत भरत नांद्रे, मायाप्पा पुजारी, तमिज मुजावर, चकोते मॅडम, यासह सुनिता मगदूम यांनी आपल्या सत्कार पर मनोगत व्यक्त केले त्यानंतर 1993 च्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सुनीता मगदूम हिचा सत्कार करून चकोते सर्व मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला स्वागत भरत नांद्रे तर आभार सुभाष इंगळे यांनी मानले.
यावेळी राजू स्वामी शितल चुडाप्पा राम शिंदे सरदार निवडे मायाप्पा धनगर शितल बोरगावे अशोक पुजारी तमीज मुजावर सुनिता मुदकांना भरत नांद्रे सुदर्शन पाटील सुभाष इंगळे सचिन पाटील गौतम चौगुले शितल खवाटे अजित पाटील यासह 1993 दहावी बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या