दानोळी परिसरात दुपती जनावरे चोरांचा धुमाकूळ, पशुपालकात भीतीचे वातावरण

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

दानोळी ता.शिरोळ परिसरातील गावात दुपती जनावरे चोरी करणाऱ्या चोरट्यानी धुमाकूळ घातला आहे. शेतात,घराबाहेर बांधलेली जनावरे चोरीस गेल्या आहेत.याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करुन ही गाई सापडल्या नाहीत.यामुळे जनावरे चोरीला आळा घालण्यासाठी चोरीच गावातील मुख्य चौक व बाहेरील प्रमुख मार्गावर सी.सी कॅमेरे बसवण्याची मागणी पशुपालकांच्यातून होत आहे.दानोळी,कवठेसार,निमशिरगाव, कोथळीसह परिसरामधील पशुपालकांनी शेतीला जोडधंदा म्हणून कर्ज काढून म्हैसी,गाई पाळल्या आहेत.यामुळे दुधाचा व्यवसाय करून यातुन घर खर्च चालवणारे अनेक कुटुंब आहेत. यातच अवेळी येणार्‍या पावसामुळे चार्‍याचा तुतवड्यामुळे पशुपालक आर्थिक संकटात सापडत आहेत.अशा परिस्थितीत गाई म्हशी चोरीच्या घटने मुळे पशुपालकामधून भिंतीचे वातावरण पसरले आहे. घरापासुन लांब शेतात गाईचा गोठा असल्याने दिवस भर चारापाणी करुन संध्याकाळी घरी परत यावे लागते.अशा परिस्थितीत रात्रीचा फायदा घेऊन चोरट्यांकडून गाई चोरीच्या घटना घडल्या आहेत.अशा चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस यंत्रणेसह,लोक प्रतिनिधीनीं ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

error: Content is protected !!