सर्वदूर पोहचली पुलाची शिरोलीच्या सर्वेश्वर महादेवाची किर्ती

Spread the love

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे 

इसवी सन १८०३ मध्ये सखलशेतीवडीत सर्वेश्वर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. सन १९९८ पर्यंत या मंदिराला पत्र्याचे शेडवजा कौलारू घराचे स्वरूप होते. दिवसेंदिवस सर्वेश्वर महादेवाची ख्याती आणि महिमा सर्वदूर पोहचू लागली. त्यातून विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद यांचे आयोजन केले जाऊ लागले. भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर जीर्णोध्दाराचा निर्णय गायकन्यांनी घेतला. सध्या मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी भक्त सढळ हाताने मदत करत आहेत. मदत करणाऱ्या भक्तांची संख्या आणि देणगी स्वरूपात मिळणारी मदत पाहता सर्वेश्वर महादेवाची महिमा सर्वदूर पोहचल्याचे ठळक होते.
गावातील लोकांत भक्ती वाढविण्यासाठी कुलकर्णी घराण्याने महाशिवरात्री द्वादशीला महाप्रसाद करण्यास सुरुवात केली. कालांतराने महाप्रसादाचा मान हुबाळे ,   शिरगावकर घराण्याकडे आला महाशिवरात्रीच्या दिवशी या दोन घराण्यांमार्फत जोशी यांच्या घरी महाप्रसादाचे साहित्य दिले जाते.
१८०३ मध्ये शिरोली गावाच्या पश्चिमेला सखल नावाच्या शेतवडीत म्हणजेच सर्वेश्वर तलावामधील सर्वेश्वरलिंगाची स्थापना मार्तंड जोशी, भाऊसो पोतनीस, बाळया स्वामी व कुलकर्णी या प्रमुख लोकांनी गावातील स्वामींच्या मठाजवळ केली. या लिगाची पूजा करण्याची जबाबदारी
नारायण श्रीपाद जोशी घराण्याकडे देण्यात आली. १९९८ पर्यंत हे महादेवाचे मंदिर कौलारू व पत्र्याच्या शेडमध्ये २५ बाय ३० जागेत होते. या मंदिरामध्ये फक्त महानंदी लिंग होते. कुलकर्णी घराण्याने महाशिवरात्री द्वादशीला महाप्रसादाचे आयोजन करण्या स सुरुवात केली कालांतराने या महाप्रसादाचा मान उबाळे व शिरगावकर या घराण्याकडे देण्यात आला.
 या महादेव मंदिराऐ जर्णोद्धार करण्यासाठी गावात भक्तीमय वातावरण टिकून राहण्यासाठी धार्मिक कार्यकमांची सुरुवात १९८६ पासून बाजीराव पाटील पाटील, चंपाबाई सुतार, भागिरथी परीट, विजय यादव या प्रमुख मंडळींनी केली. प्रत्यक्षात या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यासाठी १९९५ साली गावातील लोकांची एक कमिटी स्थापन करण्यात आली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या अधिपत्याखाली मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली.
सुरुवातीस मंदिराच्या परिसरात कूपनलिका खोदण्यात आली. ६ लाख खर्च करून मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मंदिरातील फरशी व इतर सजावटीचे पूर्ण झाले असून, मंदिरा मध्ये कोणताही धार्मिक विधी असो किंवा मंदिरासाठी कोणतेही मोठे कार्य करण्याचे असो शिरोलीच्या भाविकांना मदत आव्हान केले की शिरोलीचे भाविक सढळ हाताने मदत करतात.
error: Content is protected !!