भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी ठार!, शिये बावडा रोडवरील घटना

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी ठार झाला. रात्री उशिरापर्यंत या पादचारी वृद्धाची ओळख पटली नव्हती. शिये – कसबा बावडा मार्गावर श्री रामनगर, शिये येथील आयओएन डिजिटल झोन या परीक्षा केंद्रासमोर शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर ही मोटार रस्त्याकडेला असणाऱ्या विजेच्या खांबावर जोरात आदळली. त्यामुळे रस्ते विकासातील विजेच्या खांबांचा अडथळा अद्यापही कायम असल्याने नागरिकांतून असंतोष व्यक्त होत होता.
याबाबत घटनास्थळी व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, हरीष एकनाथ शिंदे ता. निफड, जि. नाशिक हे आपली ईर्टीगा मोटार कारने ने कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनासाठी कुटुंबासोबत निघाले होते. शिये – कसबा बावडा मार्गावर श्री रामनगर येथे अनोळखी व्यक्ती रस्ता रस्ता ओलांडत होते. त्यामुळे शिंदे यांनी आपली मोटार त्यांच्या पाठीमागून घेतली. मात्र अनोळखी व्यक्ती रस्ता ओलांडत असताना अचानक पाठीमागे सरकला. त्यामुळे शिंदे यांचे मोटारी वरील नियंत्रण सुटले आणि मोटार पादचाऱ्यास धडकली. त्यानंतर मोटार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन विजेच्या खांबावर आदळली. यामध्ये अनोळखी पादचारीचा जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतून त्यांना कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. उशिरापर्यंत त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.

error: Content is protected !!