हैदरअली मेस्त्री फ्रेंड्स सर्कलने जपली सामाजिक बांधिलकी; सुरू केली पाणपोई

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ येथील हैदरअली मेस्त्री फ्रेंडस सर्कल यांच्या मार्फत छत्रपती संभाजी महाराज चौक जुन्या स्टेट बँके समोर सामाजिक बांधिलकीतून शहरातील यावर्षीची पहिली पाणपोई सुरू करण्यात आली आहे.या पाणपोईचे उद्घाटन शंकरराव चव्हाण गुरुजी यांच्या हस्ते आज रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता करण्यात आले.दत्त साखर कारखान्याचे संचालक स्वर्गीय युसुफसो मेस्त्री यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याचा वसा घेत हैदरअली मेस्त्री यांनी उन्हाळ्याची चाहुल लागताच पाणपोई सुरू केली आहे.शिरोळ शहरात येणाऱ्या बाहेरगावच्या प्रवाशांना पिण्याच्या थंड पाण्याची सोय व्हावी व पाण्यासाठी इतरत्र फिरावे लागू नये,या उदात्त विचाराने पाणपोई सुरू केली.महापूर व कोरोना काळात ही युसुफसो मेस्त्री यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्य हैदरअली मेस्त्री यांनी जपले असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.यावेळी आप्पासो चावरे गुरुजी, फत्तेलाल मेस्त्री, चिदानंद कांबळे, खंडेराव हेरवाडे, रसूल मोमिन,रुपेश मोरे, इम्रान मेस्त्री, दिग्विजय माने, विकी शिंदे, वासिम मुल्लाणी,धीरज कलावंत, दत्तात्रय माने, अल्ताफ तहसीलदार,कवठेकर साहेब, गुंडू संकपाळ, वैभव पाटील,बाळू टोपकर यांच्यासह हैदरअली मेस्त्री फ्रेंडस सर्कल पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!