पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
समृद्धी शिक्षण प्रसारक मंडळ पाचवडे संचलित समृद्धी प्रकाशन तर्फे घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत हणमंतवाडी ता. करवीर येथील परिणीती राहुल तिबीले या विद्यार्थिनींनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर
परिणीती ही विद्यामंदिर हणमंतवाडी येथील या शाळेची विद्यार्थिनी असून तिने शंभर पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक आला. मागील वर्षी ही याच परीक्षेत परिणीती हीने राज्यात पहिलाच नंबर घेतला होता तर आता परिणीती इयत्ता दुसरी या वर्गात शिकते यावेळीही तिने राज्यात पहिला नंबर काढला. तिला शाळेच्या मुख्याध्यापक आनंदा पाटील, वर्गशिक्षिका रुचिता शिवडे, मोनिका तिबिले, राहुल तीबीले यांचे मार्गदर्शन लाभले. परिणीती ने राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.