पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली,नागांव ता हातकणंगले येथे वेगवेगळ्या चार ठिकाणी कल्याण मटका घेणाऱ्यांवर शिरोली पोलिसानी कारवाई करून रोख ६००० व टिपणं ( बुक) ताब्यात घेतली.आरोपी आफताब चाँदसाब सर्जेखान, (वय २४ ) , दिपक बाबू कांबळे दोघे ही (रा जयभवानी तालीम जवळ,शिरोली पुलाची,ता.हातकणंगले हा शिरोली),दिलीप गंगाराम पाटील (रा मेघदूत काॅलणी उचगाव करवीर)ऋषिकेश दिपक यादव (वय २५),केतन अशोक चव्हाण दोघेही रा माळवाडी नागांव या चौघांनी शिरोली सांगली फाटा व नागाव परिसर याठिकाणीआ पले स्वत:चे फायद्याकरीता या ठिकाणी थांबुन लोकांकडुन प्रत्यक्ष कल्याण मटका जुगाराचे अंक कागदावर लिहुन घेवून त्यांना अंक लिहलेल्या चिठ्ठ्या देवून त्यांचेकडून पैसे घेवून जुगार खेळ चालवित असताना सापडल्याने त्याच्याकडून रोख रक्कम ६००० व टिपणं ( बुक) ताब्यात घेवून कारवाई केली.