जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

 

प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली पुलाची येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन PHC ची पाहणी केली तसेच तेथील कामकाजाचा आढावा देखील घेतला.या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी पोस्टमार्टम रूमचे कामकाज लवकर पूर्ण करून तेथील कामकाज सुरू करण्यास सांगितले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे व तेथील निवास स्थानांचे निर्लेखन तत्काळ पूर्ण करून नवीन बांधकामा चे कामकाज सुरू करण्यास सांगितले तसेच शिरोलीतील उपकेंद्राचे निर्लेखन व त्याचे बांधकाम हे सुद्धा पूर्ण करण्यास सांगितले आहे. हायवे शेजारील पाण्याच्या टाकीजवळ वॉल कंपाऊंड देखील तात्काळ बांधण्याच्या सूचना दिल्या आहेत. या भेटीदरम्यान इचलकरंजींच्या प्रांतअधिकारी मौसमी चौगुले, हातकणंगले तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर,पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी , तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दातार तसेच ग्रामपंचायत कडील सरपंच प्रतिनिधी माजी उपसरपंच श्री कृष्णात करपे , ग्रामपंचायत सदस्य श्री महंमद महात तसेच ग्रामपंचायत प्रतिनिधी संपत संकपाळ, दीपक यादव व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली पुलाची कडील सर्व स्टाफ उपस्थित होता.दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे स्वागत शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी जेसीका अँड्र्यूज यांनी फुलाचे रोप देऊन केले.

error: Content is protected !!