पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
अनुगामी लोकराज्य महा अभियान (अनुलोम) या संस्थेमार्फत हातकणंगले विधानसभे मधील टोप येथे महाकुंभ कलश दर्शनासाठी टोप या वस्तीमध्ये अनुलोम भाग प्रमुख अजित कोळी याच्या मार्फत मारुती मंदिर,टोप येथे आणण्यात आला होता.यावेळी टोप वस्तीमित्र मिलिंद कुशिरे उपस्थित होते.यावेळी मारुती मंदिर येथे भक्तिमय वातावरणात सजावट केलेल्या स्टेज वर हा कलश ठेवण्यात आला.यानंतर गावातील प्रगतशील समाजामधील ११ जोडप्यामार्फत कलशाचे पूजन करून आरती करण्यात आली तसेच प्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रगतशील समाज, प्रभावशाली व्यक्ती, स्थान मित्र, वस्ती मित्र अनुलोमच्या आयामातील नागरिक, वारकरी तसेच टोप ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.