डंपरच्या धडकेत शिये येथील महिला जागीच ठार

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

शिये निगवे मार्गावर जाधव पेट्रोल पंम्पाशेजारी डंपरच्या धडकेत शिये येथील महिला जागीच ठार तर एकजण जखमी झाला असून हा अपघात आज सोमवारी रात्री ७ :३० वाजण्यासुमार झाला या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशीरा झाली .मयत महिलेचे नाव विद्या युवराज सिसाळ वय ३८ रा विठ्ठल नगर शिये असे असून त्या आजारी असल्याने आज दुपारी बावडा येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यासाठी आपले नातेवाईक संदिप हराळे रा भुयेवाडी यांच्या मोटरसायकल क्रमांक ने गेल्या होत्या उपचार घेवून घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपर क्रमांक एम एच ५० एन १३३७ ने जोराची धडक दिल्याने छाया सिसाळ या मोटरसायकलवरून खाली पडल्याने डंपरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर संदीप हराळे हा किरकोळ जखमी झाला . विद्या यांची घरची परिस्थिती हलाखीची असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी तर पती हे मेंढपाळ असून आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून त्या दुसर्‍याच्या शेतात रोजंदारीवर कामास जावून आपल्या संसाराचा गाडा हकत होत्या त्यांच्या अशा अपघाती निधनाने शिये गावात हळहळ व्यक्त होत आहे .

error: Content is protected !!