चालू हंगामाचे ऊसाला ३५००/ रुपये घेणारच – अंकुश संघटना

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

चालूला ३१००/रुपये पहिली उचल कारखान्यांनी जाहीर केली असली तरी हा दर कारखान्यांना होणाऱ्या फायद्याच्या तुलनेत कमी आहे ठरल्याप्रमाणे ३५००/ रुपये या हंगामात आपण घेण्यासाठी आंदोलन अंकुशला साथ द्यावी असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केले.चिंचवाड येथील विठ्ठल मंदिरा समोर ऊस दराचा लढा यशस्वी केलेल्या आंदोलन अंकुश च्या लढवय्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.त्या सत्काराला उत्तर देताना धनाजी चुडमुंगे पुढे म्हणाले की या साखर कारखानदारीतील प्रमुख घटक असलेला ऊस हा शेतकऱ्यांच्याकडे आहे.त्याचे योग्य दाम मिळाल्याशिवाय येथून पुढे तो ऊस कोणालाच द्यायचा नाही चालूला ३५००/ मिळाल्याशिवाय पुढच्या वर्षी कारखान्यांच्या तोडी घ्यायच्या नाहीत हे आत्ता पासून लक्षात असू द्या असेही त्यांनी यावेळी सांगितले.स्वागत सुरेश चव्हाण आंदोलन अंकुशचे उदय होगले,दीपक पाटील,कृष्णा देशमुख यांची यावेळी भाषणे झाली.तर राकेश जगदाळे,भूषण गंगावणे,महादेव काळे,विनोद पाटील,बंडू होगले,सुरगोंडा पाटील,सचिन पाटोळे,भरत पाटोळे,संजय चौगुले,पोपट चव्हाण,दादा गोधडे हे उपस्थित होते शेवटी आभार आप्पासो कदम यांनी मानले.

चौकट

यावर्षी पाऊसमान कमी झाल्याने पाण्याची कमतरता भासणार आहे आणि त्यामुळे उसाचे क्षेत्र कमी होऊन पुढच्या हंगामात सुद्धा उसाची टंचाई निर्माण होणार आहे. याचा फायदा उठवून आपल्याला उसाचा दर हा 4000 पार नेऊन ठेवायचा असल्यामुळे पुढच्या हंगामात सुद्धा आंदोलनाचा रेटा वाढवण्यासाठी यावर्षी सारखी साथ द्यावी अशी उपस्थित शेतकऱ्यांना धनाजी चुडमुंगे यांनी या प्रसंगी विनंती केली.

error: Content is protected !!