मजले / प्रतिनिधी
सांगली – कोल्हापूर हायवे ल
गत असणाऱ्या मजले खिंडीत दररोज हे महामार्ग पोलीस थांबून विनाकारण नागरिकांना त्रास करत असतात यावर कोणी बोलणार नाही आणि कोणी बोललं तर त्याच्यावर 353 नुसार सरकारी कामात अडथळा याप्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो मोटर वाहन कायदा नुसार योग्य ती कारवाई केली जाते काय याची सखोल चौकशी होणे गरजेची आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी प्रदेश संघटन मोबीन मुल्ला यांनी आज गुरूवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता केली आहे.यावेळी मुल्ला पुढे म्हणाले दिवसभरात या नाक्यावर थांबणाऱ्या पोलिसांकडून किती वसुली केली जाते किंवा किती दंड मारला जातो याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे,सदर महामार्गावर थांबणाऱ्या पोलिसांना दररोज हाच भाग का मिळतो याची देखील सखोल चौकशी व्हावी आणि मी भारतीय कायद्यानुसार आणि संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार बोलत राहणार असं ही मुबीन मुल्ला आष्टेकर शेवटी म्हणाले