दत्तवाड केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार सुभाष कुरुंदवाडे यांचेकडे

Spread the love

दत्तवाड / प्रतिनिधी

प्रशासकीय कामाचे सोईचे दृष्टीने केंद्रप्रमुखपदाचा पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कार्यभार मराठी विद्या मंदिर नवे दानवाडचे अध्यापक सुभाष आण्णाप्पा कुरुंदवाडे यांचेकडे नुकताच दिला गेला.मावळते केंद्रप्रमुख रमेश शंकर कोळी यांचे हस्ते त्यांचा सत्कार कन्या विद्या मंदिर घोसरवाड येथे करण्यात आला.याप्रसंगी हिंदुराव फासके, रमेश मारुती कोळी,सहदेव माळी,बाळासाहेब कांबळे,गुंडा परीट,ज्योती परीट,दिलीप शिरढोणे उपस्थित होते.केंद्रसमन्वयक म्हणून केलेल्या कार्याचा उपयोग केंद्रप्रमुख पदाचा कार्यभार करताना निश्चितच होईल असे प्रतिपादन दिलीप शिरढोणे यांनी केले.उपस्थित सर्वांनी सुभाष कुरुंदवाडे यांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!