पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
अयोध्या मध्ये बाबरी मशीद तुटली आणि राम मंदिर २२ जानेवारीला उभे राहिले.त्यासाठी गेली साडेचारशे वर्षे हिंदूंनी संघर्ष केला.परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांनी राम मंदिर उभा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनाचा ठराव करण्याचे आवाहन करत सद्या बांगला देशात,पाकिस्तानात हिंदूंची काय स्थिती आहे याचा विचार करता भविष्यात आपल्याकडे हीच स्थिती येणार आहे.याचा विचार करून देशात समान नागरी कायदा लागू करण्याबरोबरच हिंदूनी जागे होऊन संघटित होण्याची गरज असल्याचे मत तेलंगणाचे आमदार राजा सिंह ठाकूर यांनी केले.रामलल्ला प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती निमित्त शिरोलीतील शक्ती जागर मंच,सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित विराट हिंदू महासभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी कणरी मठाचे चिदानंद स्वामी,सरपंच पद्मजा करपे उपस्थित होत्या. पुढे बोलताना ठाकूर म्हणाले सद्या विघ्न संतोषी लोकांकडून हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम सुरू आहे.त्यातून धर्मांतर,लव्ह जिहाद,वक्व बोर्ड सारख्या गोष्टींना मुस्लिम समाजाकडून खतपाणी घातले जात आहे. त्यातून जर हिंदूंनी धर्मांतर, लव जिहाद रोखण्याचा प्रयत्न केला तर संबंधित कार्यकर्त्यावरच गुन्हे दाखल केले जातात ही वस्तुस्थिती आहे . त्यामुळे जे आमदार खासदार विकास कामापेक्षा हिंदूंसाठी काम करतात त्याच्याच मागे हिंदूंनी राहावे असे आव्हाहन त्यांनी केले. सध्या विशाळगड अतिक्रमण मुक्त तर वडणगे वकफ बोर्डाच्या घशातून जागा काढून घेण्याची गरज आहे. लवकरच हा वक्त बोर्डाचा कायदा संपुष्टात येणार असून ही जागा शैक्षणिक संस्था ,महाविद्यालय, स्टेडियमसाठी देवून युवकांचे भविष्य घडवण्याची गरज आहे. प्रास्ताविक परिचय सचिन मोरे यांनी केले, रूपा राणी निकम यांचे मार्गदर्शन झाले. प्रारंभी आमदार राजा सिंह ठाकुर, चिदानंद स्वामी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज श्रीराम प्रभू यांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
या विराट हिंदू महासभेला सरपंच पद्मजा करपे,आमदार अशोकराव माने, माजी सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच बाजीराव पाटील, पंचगंगा अध्यक्ष राजेश पाटील,पांडुरंग अध्यक्ष धीरज पाटील , माजी उपसरपंच सुरेश यादव ,माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, सतीश रेडेकर उपस्थित होते .
नियोजन निलेश शिंदे, योगेश खाडे, श्रीकांत कदम,विशाल खोचीकर,रोहन तांनवडे,गणेश खोंचीकर,अनिकेत पाटील,प्रथमेश खाडे, रत्नसिंह पाटील, रणजीत कदम,यांचेसह शक्ती जागर मंच व सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते यांनी केले. कार्यक्रमास हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.