इचलकरंजी विधानसभेसाठी २६८ मतदान केंद्रावर १६३४ अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती

इचलकरंजी विधानसभा मतदार संघात २६८ मतदान केंद्रावर १६३४ अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे यातील

२४३  केंद्रांवर प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.तर  राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथून मतदान यंत्रांचे वितरण करण्यात आले.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीसाठी बुधवारी २० नोहेंबर रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.मतदान प्रक्रियेसाठी जवळपास १६३४ अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली.त्यामध्ये प्रत्येक केंद्रावर 4 अधिकारी व कर्मचारी आणि 1 शिपाई तैनात असणार आहे.तर संपूर्ण प्रक्रियेसाठी 24 झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत.या झोनल अधिकार्‍यांना दंडाधिकार्‍यांचे अधिकार देण्यात आले.शिवाय प्रत्येक झोनल अधिकार्‍याबरोबर एक सेक्टर पोलिस अधिकारी असणार आहेत तर उपविभागीय अधिकारी ३,पोलीस निरीक्षक ८, सहाय्यक पोलीस निरीक्षक १३७ पोलीस कर्मचारी ssb पथकाचे १ पथक कर्नाटक राज्यातील ३२१ होमगार्ड spaf 1 प्लाटून srpf १ प्लाटून असा एकूण असा पोलीस फौजफाटा तैण्यात करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाचे निवडणूक निरीक्षक विश्व मोहन शर्मा व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता येऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय काटकर,पोलीस उपाधीक्षक समीरसिह साळवे,पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तर इचलकरंजी मतदार संघात ३ लाख १२ हजार ६६४ एकूण मतदार संख्या आहे.यामध्ये पुरुष १ लाख ५८  हजार ७२१ तर महिला १ लाख ५३ हजार ८८१ तर त्रितीयपंथी ६२ अशी मतदार संख्या आहे.

Spread the love
error: Content is protected !!