14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला मध्यप्रदेश मधून शोध घेण्यात पुलाची शिरोली पोलीसांना यश आले आहे. याबाबत आज पुलाची शिरोली पोलीसातून मिळालेली माहिती अशी की शिरोली पोलीस ठाण्यात 14 वर्षे 10 महिने वयाची अल्पवयीन मुलगी अपहरण झाले असल्याच फिर्याद दाखल करण्यात आली होती.दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तात्काळ पथके नेमून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली शिरोली पोलिसांनी कोल्हापूर बस स्थानक व रेल्वे स्टेशन येथील सी.सी.टी.व्ही.फुटेज चेक केले व सदर अपहरण मुलगी हि बस व रेल्वेने जात असल्याचे सीसीटीव्हीत मिळून आले.त्या आधार सदर अल्पवयीन मुलगी ज्या रेल्वेने गेली.त्या रेल्वेची माहिती रेल्वे स्टेशन वरुन घेतली व पुढील प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पोलीसांना व स्थानिक पोलीसांना माहिती देऊन खाजगी वाहनाने पोलीस ठाणेकडील दुसरी टिमच्या महिला पोलीस उपनिरीक्षक कावडे,सहायक फौजदार कोळी,पोलीस अंमलदार गोरे यांना रवाना केले.सदर रेल्वे हि सुरत गुजरात राज्यामध्ये थांबली.तेथील सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे अल्पवयीन मुलगी ज्या रेल्वेत बसून गेली. त्याचा पाठलाग केला व मध्यप्रदेश मधील पोलीसांची संपर्कात राहुन सदर अल्पवयीन मुलीस ताब्यात घेणेस सांगून तिला पुन्हा मध्यप्रदेश येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले,शिरोली एमआयडीसी पोलीसात दाखल गुन्हयातील अपहरीत अल्पवयीन मुलगीचा शोध घेत असताना तासगांव पोलीस ठाणे जि.सांगली येथील अपहरीत अल्पवयीन मुलगी मिळून आल्याने तिला ताब्यात घेऊन तासगांव पोलीस ताब्यात दिले तासगाव पोलीसांनी मुलीला तिच्या आईवडीलांचा ताब्यात दिले.