यड्रावकरांना मत म्हणजे भाजपाला मत – स्वाती सासणे

भाजपाला मातीत गाडायला आणि गणपतराव पाटील यांना विधानसभेत धाडायला मतदान करा

माजी जि. प. समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांचे आवाहन

शिरोळ / प्रतिनिधी

जनसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असून ग्रॅज्युएट वडापाववाला आणि एम.बी.ए.चायवाला अशी बेरोजगारांची अवस्था झाली आहे.भारतीय जनता पार्टीचे घोटाळे आणि षडयंत्र सर्व जनतेला माहित आहे. महिलांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या,पाठिंबा घेणाऱ्याचा चेहरा एक आणि रुप दुसरे असून यड्रावकरांना पाडायचे काम करा. यड्रावकरांना मत म्हणजे भाजपाला मत आहे.त्यामुळे भाजपाला मातीत गाडायला आणि गणपतराव पाटील यांना विधानसभेत धाडायला मतदान करा असे आवाहन जि.प.माजी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांनी केले.टाकवडे येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्ताने पदयात्रा,रॅली काढण्यात आली. मतदारांनी गणपतराव पाटील यांचे जल्लोषी स्वागत केले.यानंतर झालेल्या विजय निश्चय सभेत त्या बोलत होत्या.गणपतराव पाटील म्हणाले,जनतेचा आमदार म्हणून माझे आत एक बाहेर एक अशी भूमिका असणार नाही.जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारून त्यांचे जीवनमान चांगले होण्यासाठी मी काम करणार आहे. तालुक्यात जातीभेद न करता एकसंघपणे विकासाकडे जाण्याची माझी भूमिका आहे.टीकाटिप्पणी न
करता प्रत्यक्षात काम करणे महत्त्वाचे आहे.यासाठी मला निवडून द्या.ठाकरे शिवसेना शिरोळ तालुका संपर्क प्रमुख बाजीराव मालुसरे म्हणाले,शिरोळ तालुक्यातील गणपतराव पाटील यांच्या प्रचारातील जल्लोष पाहून विरोधकांचा उल्हास कमी झाला आहे.कार्यकर्ते आणि मतदारांनी आपले काम चोखपणे करून चारित्र्यसंपन्न गणपतराव पाटील यांना विधानसभेत पाठवूया आणि मविआची सत्ता आणूया.शिवसेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष वैभव उगळे म्हणाले,शिरोळ तालुक्यातील काही शिवसैनिकांना फोन करून भावनिक साद घालून मी उध्दवजी ठाकरे साहेबांना विचारून उमेदवारी घेतली असल्याचे सांगितले जात आहे.पण ते पूर्णपणे खोटे असून मी याची खात्री करून घेतली आहे.पण उध्दवजी ठाकरे हे कधीही मागे पुढे करीत नाहीत.विरोधकांच्या आमिषाला बळी न पडता गणपतराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून विजयी करायचे आहे.
स्नेहा देसाई,भीमराव अतिग्रे,अमन पटेल,राजेंद्र प्रधान, सुखदेव जनवाडे,अमोल चौगुले यांनी मनोगतातून गणपतराव पाटील यांच्या कामाविषयी माहिती देऊन त्यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले तर आभार मोहन निर्मळ यांनी मानले.शिवसेनेचे नेते चंगेजखान पठाण,पंचायत समिती माजी सभापती अर्चना चौगुले,मिनाज जमादार, सरपंच सविता चौगुले,मनोज चौगुले,शिवगोंडा पाटील, अमोल पाटील,सर्जेराव घोरपडे,दिनकर गुरव,सुजाता पाटील,जीवन बरगे,प्रा.संजय डकरे,कु.बुशेरा खोंदू, प्रभाकर निर्मळ,यशवंत नाईक,रमेश शिंदे,पद्माकर देशमुख,वसंतराव देसाई,रायगोंडा पाटील,हसन देसाई, सतीश भंडारे,राजू पाटील,लक्ष्मण हरणे,दिनकर गुरव आदींसह ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Spread the love
error: Content is protected !!