जुगार अड्ड्यावर छाप्यात ३.१८ लाखाचा मुद्देमाल जप्त : १६ जण ताब्यात
इचलकरंजी /प्रतिनिधी
कबनूर परिसरातील जयभारत कला व क्रिडा सांस्कृतीक खोलीत मंडळाच्या बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या जुगार अड्डयावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला.या कारवाईत १६ जणांवर गुन्हा
दाखल करण्यात आला असून एकुण ३ लाख १८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.कबनुरमधील याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,जयभारत सांस्कृतिक मंडळाच्या खोलीत
पोपट लोंढे याचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री त्याठिकाणी छापा टाकला असता पोपट लोंढे याच्यासह १६ जण जुगार खेळताना मिळून आले. होते.पोलिसांनी मनोहर वसंत कांबळे (रा.आंबेडकर चौक), अरविंद सिद्ध धनगर (कबनुर), सुरेश दिनकर माने ( रा.कबनुर), चंद्रकांत विनायक सोनुर ( रा. कबनुर हायस्कुल मागे), अमर तुकाराम बडे ( पुजारी मळा), राकेश बाबासाहेब कुरणे (रा. आंबेडकर चौक),हजरत सज्जन सनदी (सनदी मळा ), प्रमोद निवृत्ती कांबळे (आंबेडकर चौक), बबलु सिताराम आवळे (रा. कबनुर),सुशांत राजाराम कांबळे (रा.बुवाचे वाठार),अनिकेत आण्णाप्पा कांबळे (आंबेडकर चौक, कबनूर), इनुस कमरूद्दिन विजापुरे (रा. कबनुर शाळेमागे), संतोष दत्ता शिंदे (रा. रुई), विजय चंद्रकांत कानेटकर (रा. आंबेडकर चौक), कुमार महादेव धनवडे (रा. मराठी शाळेमागे, कबनुर) यांच्यासह जुगार अड्डा मालक पोपट लोंढे यांना ताब्यात घेतले.या कारवाईत रोख ९ हजार ८५० रुपये, १ लाख ३३ हजार रुपयांचे १३ मोबाईल, १ लाख ६० हजाराच्या ५ मोटरसायकली आणि जुगार साहित्यासह एकुण ३ लाख १८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.