वारकरी पायी दिंडीचे उल्हास पाटील परिवाराकडून स्वागत

शिरदवाडच्या वारकरी पायी दिंडीचे उल्हास पाटील परिवाराकडून स्वागत

शिरोळ / प्रतिनिधी 

कार्तिकी एकादशीनिमित्त शिरदवाड (ता शिरोळ) येथून पंढरपूर जाणारी वारकऱ्यांची पायी दिंडी शिरोळ मुक्कामी आल्यानंतर शिरोळ तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष उल्हास उत्तमराव पाटील व पाटील परिवारांच्या वतीने स्वागत करून वारकऱ्यांच्या रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली.प्रत्येक वर्षी आजरेकर फडाच्या वारकऱ्यांची शिरदवाड ते पंढरपूर कार्तिक वारी पायी दिंडी जात असते. या पायी दिंडीचा एक मुक्काम शिरोळ येथे होतो.येथील श्रीराम मंडळाच्या सभागृहात पायी दिंडीने रात्रीचा विसावा घेतला.या ठिकाणी उल्हास उत्तमराव पाटील यांच्यावतीने दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.उपस्थित वारकऱ्यांना रात्रीचे भोजन पाटील परिवाराच्या वतीने देण्यात आले. यावेळी उल्हास उत्तमराव पाटील,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,माजी सरपंच अर्जुन काळे,माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील,उत्तमराव पाटील, शिरोळभूषण दिलीपराव माने,आप्पासाहेब पुजारी, बजरंग काळे, गणपतराव माने, नितीन जगदाळे, राजेंद्र काळे, विजय काळे, सुभाष माने ताराप, संजय शिंदे, प्रल्हाद पाटील, आबासाहेब पाटील, महादेव बिसूरे, रमेश पाटील, सर्जेराव कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

Spread the love
error: Content is protected !!