राजस्थानी बांधवांनी महायुतीच्या पाठीशी रहावे – मुख्यमंत्री शर्मा

एकीकडे आपल्या देशाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतलेली प्रगतीची झेप देश पाहत आहे.तर दुसरीकडे विरोधकांच्या लुटारूंची आघाडी देशात अपप्रचाराचा प्रसार करत असून अशा प्रवृत्तीला रोखण्याची गरज व्यक्त करताना राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी इचलकरंजीत राजस्थानी बांधवांनी व्यापारी क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे.इचलकरंजीचा वस्त्रोद्योग वाढवण्यासाठी येथील नेतृत्वाने चांगले प्रयत्न केले आहेत.हेच काम आणखी पुढे जाण्यासाठी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित व्यापारी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.आपण हजारो किलोमीटवरुन आलो असलो तरी इथेही राजस्थानमध्येच असल्यासारखे वाटते, असे सांगत त्यांनी महाराष्ट्र आणि राजस्थान यांच्यातील सांस्कृतिक बंध उलगडून दाखवताना राजस्थानी माणूस जेथे जातो तेथील संस्कृती तो आपलीशी करतो, असे सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार टीका करताना भाजपने काश्मीरमधील 370 कलम हटवण्याची घोषणा केल्यावर विरोधाकांनी रक्ताच्या नद्या वाहतील अशी भूमिका घेतली.भाजपने त्याच जागी राम मंदिर बांधण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने तारीख सांगा असे सांगायला सुरुवात केली.परंतु नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही गोष्टी करून दाखवल्या आहेत. विरोधकांना केवळ खोट्याच्या फैलाव करणेच जमते. लुटणे आणि खोटं बोलणे इतकेच काम त्यांना जमते. याउलट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात प्रगती झाली असून ही गती आणखी वाढविण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थानी बांधवांनी भाजप आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.

यावेळी आमदार प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर, राहुल आवाडे, समन्वयक अशोकराव स्वामी, अनिल डाळ्या, वृषभ जैन यांची भाषणे झाली. याप्रसंगी व्यासपीठावर मिश्रीलाल जाजू, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, भाजपा शहर अध्यक्ष पै. अमृत भोसले, नितीन धुत, तानाजी पोवार, दिलीप मुथा, दिपक राशिनकर, विनोद कांकाणी, अरविंद शर्मा, सुरेंद्र राजपुरोहित, गोरखनाथ सावंत, पांडुरंग धोंडपुडे आदींसह भाजपा पदाधिकारी, व्यापारी मान्यवर उपस्थित होते

Spread the love
error: Content is protected !!