आजी-आजोबांसोबत दिवाळी साजरी करण्याचे भाग्य मिळालं – रोटे.भोसले

रोटरी हेरिटेज शिरोळच्यावतीने जानकी वृध्दाश्रमात फराळ व दिवाळी साहित्य वाटप

शिरोळ / प्रतिनिधी

रोटरी हेरिटेज सिटी शिरोळच्यावतीने प्रेसिडेंट रोटे.तुकाराम पाटील(भैया),सेक्रेटरी प्रा.रोटे.के.एम. भोसले,ट्रेझरर व पत्रकार रोटे.चंद्रकांत भाट,दिलीप शिरढोणे व कु.तन्मय तुकाराम पाटील यांनी शुक्रवारी घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमला भेट देवून निराधारांच्या समवेत दिवाळी साजरी केली.वंचित व निराधार आजीनी उपस्थितांना औक्षण करुन आशीर्वाद दिले.जगण्याचा आनंद निराधारांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.रोटे.प्रा.के.एम.भोसले सर म्हणाले की, दिवाळीनिमित्त आश्रमातील आजी -आजोबांसोबत दिवाळी गोड व आनंददायी साजरी होण्याचे भाग्य लाभले.प्रत्येकांनी आपल्या कुटुंबियांची काळजी व सुशूश्रा केली की वृद्धाश्रमांची गरज नाही.कुटुंबातील व्यक्तींनी वाळीत टाकलेल्या व दुर्लक्षित केलेल्यांची सेवा बाबासाहेब पुजारी व त्यांचे सहकारी करीत आहेत.त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे मत रोटरी हेरिटेज सिटी शिरोळ चे ट्रेझरर रोटे.चंद्रकांत भाट यांनी व्यक्त केले.निराधारांना जगण्याची उमेद देण्याच्या कार्याबद्दल जानकी वृध्दाश्रमाचे कौतुक त्यांनी केले.ज्येष्ठ मंडळींना वृद्धापकाळात कुटुंबियांनी जपणे आवश्यक आहे.जानकी वृद्धाश्रमासाठी सर्व प्रकारचे मदत करून सहकार्य करण्याचे आश्वासन रोटरी हेरिटेज सिटी शिरोळचे प्रेसिडेंट रोटे.तुकाराम पाटील (भैय्या) यांनी दिले.सर्वांना दिवाळीसाठी फराळ,उटणे,साबण,सुवासिक तेल मेणबत्ती यासह अन्य साहित्याचे वाटप त्यांनी केले.यावेळी सतीश नाईक,शिवाजी भोसले,अभिजीत नाईक,नामदेव दानवाडे, अण्णाप्पा मोडके,कर्मचारी अनिल फाटक, ऋषिकेश कोळेकर,सौरभ राऊत यांच्यासह आश्रमातील सर्व निराधार वृद्ध उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!