“मोठी कारवाई” पान-मसाला,मिक्स गुटख्याची वाहतूक करणाऱ्या स्कार्पिओवर कारवाई, ६ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त

अब्दुललाट ता.शिरोळ दरम्यानच्या वडगिरी रस्त्यावर प्रतिबंधित पान-मसाला,मिक्स गुटख्याची वाहतूक करणारी स्कार्पिओवर कारवाई करत कुरुंदवाड पोलिसांनी 6 लाख,83 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.गुटखा वाहतूक करणारा संशयित आरोपी रमेश दादु टोणपे वय वर्ष 21, रा.नवीन वसाहत,शिरदवाड ता.शिरोळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन कार्याप्पा पुजारी यांनी फिर्यादी दिली आहे.दरम्यान कुरुंदवाड पोलिसांनी कारवाईचा मोठा दणका दिला आहे.मात्र शहरात सरकारी दवाखान्यासमोर राजरोस सुगंधित तंबाखू चुना मिक्स सुपारीचा मावा राजरोस विक्री केला जात आहे याच्यावर कारवाई कधी करणार ? असा सवाल उपस्थित होत आहे.सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी टोणपे हा कर्नाटक राज्यातील बोरगाव येथून महिंद्रा कंपनीची काळया रंगाची स्कार्पिओ चारचाकी क्र एम.एच.11ए.ई.1212 मधून गुटखा घेऊन जात असताना मिळून आला.या वाहनातून रजनीगंधा पान मसाला 5 बॉक्स,रजनीगंधा सुगंधीत पान मसाला 20 बॉक्स, केशर युक्त विमल पान 30 पाकिटे, विमल पान मसाला केशरी रंगाचा एका पुडयामध्ये 22 पाकिटे,विमल पान मसाला लाल रंगाचा 52 पाकिटे, व्ही १ तंबाखु हिरवा रंग 208 पाकिटे,व्ही १ तंबाखु पिवळ्या रंगाचे 624 पाकिटे,तुलसी रॉयल जाफराणी जर्दा 54 पाकिटे हा मुद्देमाल मिळून आला.मुद्देमालासह चारचाकी स्कार्पिओ असा 6 लाख,80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.दरम्यान कुरुंदवाड पोलिसांनी गुटख्याची या आठवड्यात ही दुसरी मोठी कारवाई केल्याने गुटखा वाहतूक करणाऱ्या आणि पान टपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Spread the love
error: Content is protected !!