शिरोळ / प्रतिनिधी
अगदी अभिमानानं सांगावस वाटतं की शिरोळ तालुक्याच्या इतिहासात आजवर अनेक आमदार झाले . त्यांचं योगदान उल्लेखनीय आहेच पण शिरोळ विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या एक अपक्ष आमदार ५ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल दोन हजार पस्तीस कोटी रुपयांचा निधी शासनाकडून खेचून आणणारा आणि शिरोळ तालुक्याचं रूपडं बदलणारा एकमेव नेता म्हणजे यड्रावकर आपल्या तालुक्यातील युवकांचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि इथल्या युवकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवण्यासाठी शिरोळ येथे तब्बल 7 एकर जागेवर क्रीडा संकुल उभारण्याची मंजुरी आणली आणि त्यासाठी तब्बल 5 कोटी रुपये मंजूर करून त्यामधील एक कोटी रुपये त्या ठिकाणी जमा झाले आहेत.तालुक्यातील युवक हा सैन्यदल,पोलिस भरती, कुस्ती, कब्बडी अशा अनेक क्रीडा प्रकारात नेहमीच आघाडीवर राहिला आहे.पण कमतरता होती ती सर्व सोयींनी युक्त अशा आधुनिक क्रीडा संकुलाची…आता क्रीडा संकुलाच्या निमित्ताने युवकांची गरज पूर्ण झाली असून या मातीतला युवक आता आदरणीय साहेबांच्या प्रेरणेने क्रीडा क्षेत्रात उत्तुंग झेप घेईल असा मला विश्वास वाटतो.एकीकडे देशातील बेकारीचा आणि बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत असताना ..माझ्या तालुक्यातील युवकाला हाताला काम मिळालं पाहिजे आणि तो आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम बनला पाहिजे ही दूरदृष्टी ठेवून साहेबांनी ही औद्योगिक वसाहत मंजूर करून आणली..आणि युवकांच्या उद्योग व्यवसायाला आणि रोजगार निर्मितीला खऱ्या अर्थानं प्रचंड चालना दिली.छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे इथल्या युवकांचा जीव की प्राण…महाराज हा आमच्या अस्मितेचा विषय..पण ” छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ मिरवणुकीत डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नव्हे तर तो डोक्यात घेऊन मनन , चिंतन आणि आचरण करण्याचा विषय आहे .” हे लक्षात घेऊन आदरणीय साहेबांनी जयसिंगपूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ अश्वारूढ पुतळाच उभा केला नाही तर महाराजांच्या जीवन चरित्राचा संस्कार इथल्या युवकांवर व्हावा म्हणून म्युझियम देखील उभ केल आहे. याशिवाय तब्बल 28 कोटी रुपये खर्च करून इंग्लंड येथील लॉट्स स्टेडियमच्या धरतीवर जयसिंगपूर मध्ये उभे केलेले शाहू स्टेडियम स्टेडियम, उदगावमध्ये सुरू केलेलं महाराष्ट्रातील सर्वात मोठं असं तब्बल 300 बेडचं मनोरुग्णालय…, दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत, तालुक्यातील सर्व प्रकारचे रस्ते, तीन शहरांच्या नगरपरिषदेसाठी कोट्यावधी फंड, .20 कोटी रुपये खर्च करून बांधलेली जयसिंगपूर नगर परिषदेची इमारत, आरोग्य राज्यमंत्री असताना तालुक्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयाची व्यवस्था व तालुक्यासाठी अनेक ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध अशी साहेबांनी केलेल्या कामांची यादी न संपणारी आहे.म्हणूनच या सर्व कामांच्या जीवावर आणि युवकांचे जे दूरदृष्टी ठेवून सोडवले गेलेले प्रश्न यामुळे शिरोळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिग्विजय माने यांना असा विश्वास वाटतो