पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर के एम टी बसची दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलासह वडील जखमी झाले त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू
पुलाची शिरोली / प्रतिनिधी
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवा रस्त्यावर जखमी संदीप रामदास ठमके हे आपल्या दुचाकी क्रमांक एम .एच ०९ .ए .युव्ह ३११६ ने शिरोली पुलाची येथे घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या केएमटी बस क्रमांक क्र.एम एच ०९ सी व्हि ०४३१ च्या चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला केएमटी बसची धडक बसतात संदीपने प्रसंगावधान राखत आपल्या चार वर्षाचा मुलगा विराज ठमके या आपल्या मुलाला दुखापत होऊन नये म्हणून त्यास सावरत गाडी केएमटी बस खाली सोडून दिली बस चालकाने दुचाकीस दहा ते पंधरा फुटापर्यंत फरफटत नेली रस्त्यावर पडल्याने संदीप व त्याच्या मुलास किरकोळच दुखापत झाल्याने उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे .